• Sun. Aug 2nd, 2026

    Panvel Crime: मृतांना ‘जिवंत’ करुन 2.29 कोटींचा घोटाळा; गोव्यातून पाच जणांची टोळी जेरबंद, प्रकरण काय?

    Panvel Crime: मृतांना ‘जिवंत’ करुन 2.29 कोटींचा घोटाळा; गोव्यातून पाच जणांची टोळी जेरबंद, प्रकरण काय?

    Panvel Crime: इस्रायलमध्ये निधन झालेल्या २ शेतकऱ्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.

    पनवेल जमीन घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: इस्रायलमध्ये निधन झालेल्या दोन शेतकऱ्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावावरील करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवहारातून बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पाच महिन्यांच्या तपासानंतर आरोपींना गोव्यातून अटक केली.

    करंजाडे येथील सर्वेक्षण क्रमांक ८१/२ मधील ४७ गुंठे जमीन नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम ऊर्फ सेलीम एलियाहू चिंचोलकर यांच्या नावावर होती. हे दोघेही इस्रायलमध्ये वास्तव्यास गेले होते. नाथन यांचे २०११मध्ये, तर शालोम यांचे २०१६मध्ये निधन झाले. त्यांचे वारसदार सध्या इस्रायल आणि अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती आरोपी सुरज वासुदेव शिंदे याला मिळाली, असे पोलिसांनी सांगितले.

    Maharashtra TimesPratap Sarnaik: राज्यात लवकरच रुग्णवाहिका धोरण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
    पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज शिंदे याने स्वतःच्या वडिलांना नाथन चिंचोलकर म्हणून, तर मेहुणा मनीष मनोहर मोरे याला शालोम चिंचोलकर म्हणून उभे केले. त्यांच्या नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून ही जमीन सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर आणि त्यांचा मुलगा श्रेयस पाटेकर यांना विकण्यात आली.

    Maharashtra TimesHealth Scheme: धक्कादायक! खोटे रुग्ण आणि बनावट कागदपत्रे दाखवून ३ रुग्णालयांनी लाटले सरकारचे दोन कोटी रुपये
    या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरज शिंदे कुटुंबीय व साथीदारांसह फरार झाला होता. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार मोबाइल क्रमांक, निवासस्थान आणि राज्ये बदलत होता. तपासात तो महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथील विविध लॉज व हॉटेलमध्ये राहत असल्याचे समोर आले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा