Sushma andhare status : विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांचे स्टेटस व्हायरल झाले आहे. आमदारकी १०० वेळा कुर्बान म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची ओवाळणी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपने काल रात्री आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यावेळी मोठे धक्कातंत्र वापरत ५ उमेदवारांना संधी दिली आहे. या यादीमध्ये प्रज्ञा सातव यांचेही नाव आहे. दुसरीकडे, आज विधान परिषदेच्या निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे लक्ष असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असतानाच महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही वेळातच, काँग्रेसनेही आपली भूमिका जाहीर करत आपणही या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली असून, महाविकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंबादास दानवे यांना उमेदवारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पक्षाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतर काही मिनिटांतच काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे महाविकास आघाडीतील एकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
अंधारेंचे स्टेटस चर्चेत
या सर्व घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे सोशल मीडिया स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे. अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी हे स्टेटस ठेवले आहे. या स्टेटसमुळे सुषमा अंधारे नाराज आहेत की काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये फक्त एकच ओळ लिहिली आहे, ती म्हणजे: “आमदारकी, खासदारकी आपल्यावरून १०० वेळा कुर्बान..!”
राजकीय तर्क-वितर्क
सुषमा अंधारे यांनी एक जुना व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या उद्धव ठाकरे यांची ओवाळणी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जुना असला तरी, विधान परिषदेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या कॅप्शनमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जरी त्यांनी ‘१०० आमदारकी-खासदारकी कुर्बान’ असे म्हटले असले, तरी राजकीय अभ्यासक यातून वेगळे अर्थ काढत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा