Pune Crime News : चुलत भावानेच केला ‘गेम’; वरातीतल्या वादातून भावाचीच केली हत्या
पुण्यातील कात्रज परिसरात काही दिवसांपूर्वी एका घरात लग्नाचा मोठा उत्साह सुरू होता. डीजेचा दणदणाट, नातेवाईकांची गर्दी आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची मिरवणूक रस्त्यावर निघाली आणि सगळे मनसोक्त नाचत होते. पण या आनंदाच्या क्षणातच एक छोटासा वाद पेटला… आणि पुढे त्याने भीषण वळण घेतलं. तेजस पिलाने (२४) आणि त्याचा चुलत भाऊ विशाल खोपडे हे दोघेही त्या मिरवणुकीत होते. नाचण्यावरून दोघांमध्ये अचानक वाद झाला. त्या वेळी आजूबाजूच्या लोकांनी समजावून प्रकरण शांत केलं आणि मिरवणूक पुढे सरकली. सगळ्यांना वाटलं वाद संपला, पण विशालच्या मनात मात्र तो राग तसाच राहिला. काही दिवस गेले… पण राग कमी झाला नाही. उलट तो सूडात बदलला. विशालने आपल्या काही साथीदारांसोबत मिळून तेजसला संपवण्याचा कट रचला.
