Maharashtra Weather Forecast: मुंबई शहरात शनिवारी शहरात कमाल तापमान ३३.७ अंश; तर सांताक्रूझमध्ये ३५.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मात्र, केवळ तापमान नव्हे, तर वातावरणातील ६० ते ७० टक्के आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता अधिक तीव्र होती.
heat waves(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई/ नवी दिल्ली: येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान; तसेच मध्य भारतातील तुरळक भागांत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. किनारपट्टी आणि पूर्वेकडील भागात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, उत्तर भारताच्या काही भागांत रात्रीही उकाडा जाणवू शकतो. ‘२७ एप्रिलपर्यंत वायव्य भारतातील कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल; तर मध्य आणि इतर भागांत अंदाजाच्या कालावधीत तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ आणि त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे,’ असेही यांनी सांगितले.
महाराष्ट्रातही दिवसेंदिवस उष्णतेचे चटके तीव्र होत आहेत. खान्देशचा पारा गेल्या काही दिवसांपासून ४१ ते ४३ अंशांदरम्यान रेंगाळत आहे. जळगावचे तापमान ४३.४, नंदुरबार ४१; तर अहिल्यानगरचा पारा ४० अंशावर गेला. राज्यात शनिवारी उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात आणि सर्वांत कमी किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४० ते ४५ अंशांच्या पुढेच नोंदवला गेल्याने यंदा राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे.
नाशिकमध्ये शनिवारी तापमानाचा पारा थेट ४१ अंशांवर गेला. शुक्रवारी कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यामध्ये चोवीस तासांत सुमारे दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते ४१.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. मालेगावला ४३.४, जळगावला ४३.३, तर छत्रपती संभाजीनगरला ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी किमान तापमानही २२.३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.
खान्देशात साठ्यात घट
जळगाव : खान्देशात सध्या उन्हाचा तडाखा वाढून तापमानाचा पारा ४१ ते ४३ अंशांच्या दरम्यान स्थिरावला आहे. उष्णतेमुळे जलप्रकल्पांमधील पातळीतही वेगाने घट होऊ लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४७.३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, पावसाळा सुरू होईपर्यंत पुढील तीन ते साडेतीन महिने पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : देशात अनेक भागांत तापमानाचा पारा वाढत असताना भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटांबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना प्रसृत केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. थेट सूर्यप्रकाशात, विशेषतः दुपारच्या वेळी जास्त वेळ राहणे टाळा, पुरेसे पाणी प्या, हलके आणि सैल कपडे घाला आणि अधिक तापमानाच्या काळात बाहेर मेहनतीच्या गोष्टी टाळा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे विभागाने स्पष्ट केले. भारतीय हवामान विभागाने मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांसारख्या संवेदनशील गटांसाठी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा