• Sat. Jun 6th, 2026
    Pune News : हॉस्पिटलमध्ये पायी निघाली, अचानक प्रसुती कळा असह्य, कुणी स्कार्फ तर कुणी साड्या आणल्या; पुण्यात महिलेनं भररस्त्यात बाळाला दिला जन्म

    Pune Shirur Nirman Plaza Baby Birth : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात माणुसकी उदाहरण पाहायला मिळालं आहे. येथे असलेल्या निर्माण प्लाझामध्ये भरदिवसा एका बाळाचा जन्म झाला आहे.

    शिरुर निर्माण प्लाझा महिलेची रस्त्यात प्रसुती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : आजकाल माणुसकी संपलीय, असं आपण सहज म्हणतो, पण शिरूरमध्ये घडलेली एक घटना हे वाक्य खोटं ठरवून गेली. पुण्यातील शिरूरच्या निर्माण प्लाझा परिसरात आज एक थरारक पण मनाला स्पर्श करणारी घटना घडली. जोशीवाडी येथील एक गरीब गरोदर महिला पोटात तीव्र दुखत असल्यामुळे शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे पायी निघाली होती. पण निर्माण प्लाझाजवळ येताच तिच्या प्रसुती कळा खूप वाढल्या. वेदना असह्य झाल्यामुळे ती रस्त्यातच बसली आणि काही कळायच्या आतच तिने तिथेच बाळाला जन्म दिला.

    कुणी आपला स्कार्फ काढला, तर कुणी…

    हा प्रकार पाहताच परिसरातील महिलांनी लगेच धाव घेतली. कुणी आपला स्कार्फ काढून आडोसा केला, तर कुणी शेजारच्या घरातून साड्या आणल्या. काही मिनिटांतच त्यांनी तिथे छोटासा सुरक्षित भाग तयार केला. त्या महिलेला धीर देत सर्वजणी मदत करू लागल्या. ही माहिती मिळताच नगरसेविका डॉ. सुनिता पोटे आणि पूजा पोटावळे घटनास्थळी पोहोचल्या.
    Maharashtra TimesAAP Crisis : आपमध्ये भूकंप, ठाकरेंची साथ न सोडणारे संजय राऊत कडाडले; भाजप, राघव चड्ढांसह फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला

    ‘निर्माण प्लाझावर निर्माणचा जन्म’

    दरम्यान, बाळाचा जन्म झाला होता पण ते रडत नव्हतं. त्यामुळे तिथे उपस्थित सगळ्यांची भीती वाढली. मात्र डॉ. सुनिता पोटे यांनी प्रसंगावधान राखत लगेच बाळाला तपासलं आणि योग्य ती मदत केली. त्यांच्या अनुभवामुळे काही क्षणांतच बाळ रडायला लागलं. तो आवाज ऐकताच सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही वेळापूर्वी तणावात असलेलं वातावरण अचानक आनंदात बदललं. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘निर्माण प्लाझावर झाला निर्माणचा जन्म,’ असं म्हणत सर्वांनी आनंद साजरा केला. रिक्षाचालक, मेडिकल स्टोअरवाले, पत्रकार आणि इतर नागरिकांनीही यावेळी मोठी मदत केली.
    Maharashtra TimesJalgaon-Delhi Flight : प्रवाशांसाठी मोठी बातमी! जळगावाच्या इतिहासात नवा अध्याय, इंदूरसह दिल्ली विमानसेवा; कधीपासून सुरु होणार?
    यानंतर आई आणि बाळाला मिरा नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. ही घटना एक मोठा संदेश देऊन जाते. अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे. अडचणीच्यावेळी कोण कोणाला मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही. आज शिरूरमध्ये फक्त एका बाळाचा जन्म झाला नाही, तर माणुसकीचाही जन्म झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा