Pune Woman Ends Life: पुण्यात एका धक्कादायर प्रकराणामुळे खळबळ उडाली आहे. डिसेंबर महिन्यात एका 19 वर्षींय तरूणीने जीवन संपवलं होतं. या प्रकरणात आता तरुणीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे: पुण्यात काही महिन्यांपूर्वी एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळालं आहे. त्यामुळे साक्षीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. करिअर आणि लग्नाच्या भविष्यातील वादातून तणाव वाढल्याने एका 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचे प्रकरण आता चार महिन्यांनी पुन्हा चर्चेत आले आहे.
नेमकं काय घडलं?
साक्षी येनपुरे (वय 19, रा. धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून, अर्थव सदानंद कुलकर्णी (वय 19, रा. मोहननगर, धनकवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोघेही एकाच वयाचे असून त्यांचे प्रेमसंबंध होते, अशी साक्षीच्या कुटुंबियांनी माहिती दिली होती.PMP Bus Accident: दुकानात शिरल्यानंतर आता पीएमपी बसची कचऱ्याच्या गाडीला धडक, पुन्हा एकदा ब्रेक झाला फेल; कामगार थेट खाली पडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि अर्थव यांच्यात लग्नाच्या विषयावरून सतत वाद होत होते. अर्थवचा आग्रह होता की आधी करिअरवर लक्ष केंद्रित करावे आणि त्यानंतर लग्नाचा विचार करावा. मात्र साक्षीला लवकर लग्न करायचे असल्याने दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. या तणावातून साक्षीने 23 डिसेंबर 2025रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे गुन्हा दाखल
या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र चार महिन्यांनंतर साक्षीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे नवीन पुरावे सादर केले. त्यामध्ये तिच्या आई आणि भावाच्या मोबाईलवरील ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश होता. या रेकॉर्डिंगची तपासणी केल्यानंतर संबंधित आवाज अर्थव कुलकर्णी याचाच असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Pune News : पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, वारजेत प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी सलूनमध्ये झटापट, युवकाच्या कानाला गोळी, दोन जखमी
या संभाषणांमधून तिला मानसिक तणाव दिला गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, त्याच कारणामुळे साक्षीने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी अर्थव कुलकर्णीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या सहायक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुण पिढीतील नातेसंबंध आणि मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा