• Sun. Jun 7th, 2026
    अ‍ॅक्सिस नासिक ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर पीडितांचे फोटो शेअर, नाशिक TCS प्रकरणात 75 मिनिटांचा युक्तिवाद, लॅपटॉप स्क्रीनमागे भयंकर

    Nashik TCS Case : संशयित तौसिफ बिलाल अत्तार याने कंपनीतील ठराविक कर्मचाऱ्यांच्या ‘अ‍ॅक्सिस नासिक’ या नावाच्या ग्रुपवर पीडिताचे फोटो शेअर केले होते

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीत एका तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नात नाशिक जिल्हा न्यायालयात तब्बल सव्वातास दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर चारही संशयितांना २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

    संशयितांनी त्यांच्या धर्माची टोपी पीडिताला परिधान करून त्याचे फोटो, व्हिडीओ एका विशिष्ट ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर शेअर केले होते. या ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’चा मुद्दा आता न्यायालयीन पटलावर आला असून, ‘एसआयटी’ने त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. कंपनीतील विवाहित तरुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात संशयित तौसिफ बिलाल अत्तार (वय ३७), दानिश एजाज शेख (३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (३४) व रझा रफीक मेमन (३५) यांना नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘एसआयटी’ने अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

    अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांच्या न्यायकक्षात ‘इन कॅमेरा’ सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक संचालक किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला. संशयितांच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल, उमेश वालझाडे, बाबा सय्यद, हानिद शेख यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
    Maharashtra TimesNagpur Crime : तुझ्या मुलीला शरीरसुख द्यायला सांग ना, शब्द ऐकताच बापाचा ताबा सुटला; हॉटेल मालकाच्या मृत्यूचं गूढ उकललं
    दरम्यान, संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, कंपनीच्या ‘असिस्टंट जनरल मॅनेजर’ अश्निनी चैनानी हे नाशिकरोड कारागृहात आहेत. संशयित निदा खान ही पसार आहे. निदा वगळता सर्व संशयितांच्या उर्वरित गुन्ह्यांतील जामीन अर्जावर २८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

    BJP protest | महिला आरक्षणावरून वाद पेटला, पुण्यात भाजपचं काँग्रेसविरोधात मोर्चा, जोडे मारून निषेध

    ‘अ‍ॅक्सिस नासिक ग्रुप’

    कंपनीतील लॅपटॉपच्या स्क्रीनमागे धार्मिक कट्टरतेचे एक भयानक ‘नेटवर्क’ सक्रिय होते, याबाबत ‘मटा’ने १० एप्रिल रोजी ‘व्हॉट्सअ‍ॅपवर धार्मिक कट्टरतेची बीजे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तावर आता पोलिस तपासासह न्यायालयीन पटलावर आलेल्या मुद्द्यांतून शिक्कामोर्तब झाले. संशयित अत्तार याने कंपनीतील ठराविक कर्मचाऱ्यांच्या ‘अ‍ॅक्सिस नासिक’ या नावाच्या ग्रुपवर पीडिताचे फोटो शेअर केले होते. दरम्यान, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पोलिस आयुक्तालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesDombivli News : सायनला लोकलमध्ये चढले, डब्यातच बेशुद्ध, डोंबिवलीकर ज्येष्ठाकडे प्रवाशांसह रेल्वेचंही दुर्लक्ष, रात्रभर 15 तास ट्रेनमध्येच पडून

    पोलिस कोठडीची कारणे

    – संशयितांनी त्यांच्या धर्माची टोपी कोठे घातली, यासह संशयिताने दिलेल्या शिरखुर्मा खाल्यानंतर फिर्यादीचे डोके जड झाल्याने नशा आल्यासारखे वाटले
    – संशयितांनी त्यांच्या धर्माची टोपी फिर्यादीच्या डोक्यावर घालण्यासाठी नेताना वापरलेली कार जप्त करायची आहे
    – संशयितांनी फिर्यादीला मांसाहार करण्यासाठी नेलेल्या हॉटेलात तपास करायचा आहे
    – मांसाहारासाठी नेताना वापरलेली दुसरी कार जप्त करायची आहे
    – संशयित कुरेशी याचा मोबाइल जप्त करणे
    – संशयित हे कौटुंबिक अडचणीबाबत विचारून जवळीक निर्माण करून ‘ब्लॅक मॅजिक’बाबत सल्ला देत, संशयित तौसिफ व इतर संशयित त्यांचे स्वतःचे कार्यालयीन काम फिर्यादींना देत
    – वरिष्ठ कार्यालयात पाठवायचे फिर्यादीचा चुकीचा रिपोर्ट

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा