• Sun. Jun 14th, 2026
    संजय गायकवाडांच्या घरावर 28 एप्रिलला मोर्चा; रोहित पवारांचा इशारा, बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’चे होणार वाचन

    Rohit Pawar On Sanjay Gaikwad: प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ याही पुस्तकाचे शीर्षक बदलण्याची मागणी आमदार गायकवाड करणार आहेत का, असाही सवाल केला जात आहे.

    शिवाजी कोण होता पुस्तक वाद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ २८ एप्रिल रोजी बुलढाण्यातील त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. याच दिवशी बुलढाण्यात ‘ शिवाजी कोण होता ?’ या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे.

    या पुस्तकाचे विद्यमान प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांनी बुधवारी रात्री शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आंबी यांनी गुरुवारी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण, २४ तासानंतरही गुन्हा दाखल करण्याची कोणतीच प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली नाही. यामुळे कोल्हापुरातील अनेक कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. पोलिस अधिकारी सतीश होडगर यांना धारेवर धरले.

    Maharashtra TimesBageshwar Baba : ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन् रामदास स्वामींना म्हणाले राजपाट सांभाळा’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
    आमदार पवार दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी पानसरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथून दुचाकीने पोलिस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, विजय देवणे, राजू लाटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाशक आंबी यांच्यासह पानसरे कुटुंबातील सदस्यही यावेळी त्यांच्या समवेत होते. सुमारे दीड तास या सर्वांनी पोलिस अधिकारी होडगर यांच्याकडे गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला.

    ‘आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेली दिलगिरी मान्य नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, कॉम्रेड पानसरे यांचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची कलमे दाखल करून कठोर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू राहील,’ असे या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी म्हणाले.

    दरम्यान, काँग्रेस टनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी या पत्राद्वारे केली. गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचा निषेध केला. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आक्रमण आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. दरम्यान, ‘आमदार संजय गायकवाड त्यांच्याबाबत जे काही करायचे आहे, ते शिंदेच करतील,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रसारमाध्यमांना सांगितले.

    BJP protest | महिला आरक्षणावरून वाद पेटला, पुण्यात भाजपचं काँग्रेसविरोधात मोर्चा, जोडे मारून निषेध

    गायकवाड म्हणतात, ‘अपमान सहन करणार नाही’
    बुलढाणा : ‘शिवाजी महाराज यांचा कुठेही उल्लेख करताना ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’ असाच केला जातो. यापूर्वीसुद्धा विधानसभेत राज्यातील जेवढ्याही संस्थांना ‘शिवाजी’ हे नाव आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज या नावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. शिवाजी शिक्षण संस्थेचे नाव बदलावे आणि ‘छत्रपती’ असे जोडावे; शिवरायांचा अवमान करू नये, असे सांगितले होते. शिवरायांच्या विचाराने जगणारे आणि मरणारे आम्ही लोक आहोत. त्यांचा पदोपदी अपमान सहन करणार नाही. या पुस्तकात पाचशे ते सातशे वेळेस ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला आहे. ‘शिवाजी महाराज मराठा वंशाचे नव्हतेच,’ असेही त्यामध्ये म्हटले आहे. आणखी काही आक्षेपार्ह बाबी आहेत. या दुरुस्त व्हायला हव्यात,’ असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा