• Sat. Jun 6th, 2026

    पुण्यात PMP Busमधून तिकीट काढणं झालं सोपं! आता कंडक्टरविनाच बुकिंग शक्य; स्वारगेट, चाकण, कात्रजमध्ये सेवा सुरू

    पुण्यात PMP Busमधून तिकीट काढणं झालं सोपं! आता कंडक्टरविनाच बुकिंग शक्य; स्वारगेट, चाकण, कात्रजमध्ये सेवा सुरू

    Pune News: आपली पीएमपीएमएल अॅपच्या प्रचारासाठी पुण्यात एक नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे बसमध्ये बसताच, आपल्या सीटवरून प्रवाशांना तिकिट बुक करता येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुण्यात पीएमपी बसने प्रवास करणं आता आणखी सोपं होणार आहे. बसमध्ये बसल्यावर तिकीट काढण्यासाठी आता कंडक्टरची वाट पहावी लागणार नाही. पुणे महानगर परिवहन महामंडळा लिमिटेडच्या नव्या उपक्रमामुळे तिकिट काढण्याची प्रक्रिया एकदम सोपी होणार आहे. आपली पीएमपीएमएल या मोबाईल अॅपच्या प्रचारासाठी हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

    काय आहे नवा उपक्रम?

    आता पीएमपीमध्ये बसच्या सीटवर क्यूआर कोड बसविण्यात आले आहेत. हे कोड स्कॅन करून सरळ ते प्रवाशांना थेट अॅपपर्यंत पोहोचवतं. त्यानंतर त्यावरून थेट तिकीट बुक करता येणार आहे. यासाठी बसमध्ये प्रत्येक सीटच्या मागे क्यूआर कोड स्टीकर्स लावण्यात आले आहेत. गर्दी असताना अनेक वेळा कंडक्टरला प्रवाशांपर्यंत पोहोचणं ही कठीण होतं. अशा वेळी कंडक्टरविनाच तिकिट काढून प्रवासी प्रवास करू शकतात.Maharashtra TimesPune Accident: कात्रज घाटात भीषण अपघात; एसटी-रिक्षाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; चालकाचा जागीच मृत्यू

    पुणे शहरातील बसमधील प्रवास डिजिटल आणि अधिक आरामदायी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपली पीएमपीएमएल हे अॅप गेल्या काही काळापासून कार्यरत आहे. पण प्रवाशांना याची माहिती नसल्यामुळे अजूनही ते पारंपारिक तिकीट बुकिंग पद्धतींचा वापर करतात. अशा प्रवाशांमध्ये अॅपबद्दल जनजागृती वाढवून प्रवास आधुनिक करण्याचा हेतू आहे.

    कुठे आहे सेवा सुरू?

    या मोहिमेंतर्गत पीएमपीच्या 927 बसेसमध्ये एकूण 28, 305 क्यूआर कोड स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. स्वारगेट, कात्रज, वाघोली, बाणेर, चाकण, बालेवाडी, हिंजवडी-मान, अप्प भेकराई नगर आणि शेवालवाडीसह 10 प्रमुख बस डेपोमधून सुटणाऱ्या बसेसमध्ये हे स्टिकर्स लावण्यात यश मिळालं आहे. आता उर्वरित बसेसमध्येही ही प्रक्रिया सुरू आहे.

    Maharashtra TimesPune News: पोराच्या हातात रिक्षा, बाप मागच्या सीटवर खुशाल बसलाय; पिंपरी चिंचवडमध्ये 12-13 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

    पीएमपी पॅसेंजर फोरमचे मानद सचिव संजय शितोळे यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना याबद्दल काही चिंता व्यक्त केल्या, “अ ॅपद्वारे तिकीट सुविधा उपयुक्त आहे, परंतु बस ट्रॅकिंग योग्यरित्या काम करत नाही. अ ॅप सुरळीतपणे चालणे आवश्यक आहे. जेव्हा प्रवाशांना बसच्या अचूक वेळेची आवश्यकता असते, तेव्हा ते बऱ्याचदा हळू चालतं किंवा ट्रॅकिंग दर्शविण्यात अयशस्वी होते.”

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा