• Sat. Jun 13th, 2026
    Mumbai Local : CSMT स्टेशनवर एकाच ट्रॅकवर दोन लोकल, रेल्वेचं अखेर स्पष्टीकरण; कोणत्या चुकीमुळे घडली विचित्र घटना?

    Mumbai Local Train Disruption at CSMT : मुंबईतील CSMT स्थानकात सिग्नल बिघाडामुळे बदलापूर लोकल चुकीच्या प्लॅटफॉर्मवर शिरली. दोन लोकल समोरासमोर आल्याने खळबळ उडाली होती.

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये एकाच रुळांवर लोकल समोरासमोर आल्याची घटना मानवी चुकीमुळे घडली. ही अनपेक्षित दुर्घटना मोटरमनच्या तत्परतेबरोबरच साहाय्यक चेतावणी प्रणाली (ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टिम-एडब्ल्यूएस) आणि इंटरलॉकिंग अशा अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे टळली, असा दावा मध्य रेल्वेने गुरुवारी केला.

    लोकलला फलाट-५चा सिग्नल दिला

    बदलापूरहून ‘सीएसएमटी’ला येणारी जलद लोकल फलाट-४वर येणे अपेक्षित होती. मात्र, लोकलला फलाट-५चा सिग्नल देण्यात आला. त्याच फलाटावर खोपोली लोकल उभी होती. सिग्नल मिळाल्याने लोकल पुढे गेली. यामुळे समोरासमोर लोकल आल्याची विचित्र घटना मंगळवार, २१ एप्रिलला घडली होती.
    Maharashtra TimesMarathi Compulsion : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसक्ती, सरनाईकांच्या निर्णयाला ‘मनसे’चा पाठिंबा, मात्र शिवसेनेतूनच विरोध, पुनर्विचाराची मागणी

    लाल सिग्नलपूर्वीच लोकल थांबवली

    प्राथमिक तपासात, घटनेचे मूळ कारण क्षणिक दुर्लक्ष म्हणजेच मानवी चूक असल्याचे आढळले. सिग्नलसंबंधित इंटरलॉकिंग आणि ‘एडब्ल्यूएस’ ही रेल्वे सुरक्षेचा कणा मानली जाते. या प्रणालीमुळे एकाचवेळी परस्परविरोधी हालचाली होऊ नयेत, यासाठी ही यंत्रणा काम करते. रुळांवर लोकल नसल्यावरच यंत्रणेतून हिरवा सिग्नल दिला जातो. त्याचवेळी पॉइंट्स योग्यरित्या जुळलेले आणि लॉक असल्याची खात्रीही प्रणाली करते. घटनेच्या दिवशीही दोन्ही यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होत्या. त्यामुळे मोटरमनने लाल सिग्नलपूर्वीच लोकल थांबवली. ‘एडब्ल्यूएस’ सतत कार्यरत राहून सतर्कतेचा इशारा देत होती. मानवी सतर्कता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय सुरक्षेची हमी देतो. त्यामुळे ‘फेल सेफ’ यंत्रणा अशा अनपेक्षित घटना रोखण्यासाठी सक्षम असल्याचे दावा मध्य रेल्वेने केला.

    धावत्या लोकलवर लोखंडी रॉड आदळला

    मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर लोखंडी रॉड आदळल्याने एकनाथ थोमरे (वय ४५) आणि रोहित सरुकते (वय २४) प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी मध्य रेल्वेने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
    Maharashtra TimesIron Rod Hit Running Local : बेजबाबदारपणा नडला; रेल्वे ट्रॅकवर काम सुरु असताना ब्लॉकचा विसर, धावत्या लोकलवर लोखंडी रॉड आदळला, एकाची प्रकृती गंभीर

    लोखंडी रॉड धावत्या लोकलवर आदळला

    रेल्वे रुळांलगत काम करण्यासाठी ब्लॉक घेणे गरजेचे असते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अभियांत्रिकी विभागाला या सुरक्षा नियमांचा विसर पडल्याने त्याचा फटका दोन प्रवाशांना बसला आहे. कल्याण ते कसारा विभागातील खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळांलगत असलेल्या उतारावर संरक्षणात्मक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास तीन मीटर लांबीचा लोखंडी रॉड धावत्या लोकलवर आदळला. त्याचबरोबर काही दगडही दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांना लागले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा