Marathi Mandatory to Rickshaw Taxi Driver : प्रताप सरनाईक यांच्या मराठीसक्तीच्या निर्णयाला त्यांच्याच शिवसेना पक्षातील संजय निरूपम यांनी विरोध दर्शवत अमराठी रिक्षा चालकांची बाजू घेतली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : येत्या १ मे पासून मुंबईसह राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाला आता राजकीय वळण लागले आहे. प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला त्यांच्याच पक्षातील संजय निरूपम यांनी विरोध दर्शवत अमराठी रिक्षाचालकांची बाजू घेतली आहे. निरुपम यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करत प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे
महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीसक्ती
राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी सक्तीची करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. या निर्णयाला अमराठी रिक्षाचालक-मालकांनी मराठी बोलण्यास विरोध दर्शवत ४ मेपासून रोज निदर्शने करण्याचा इशारा दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
एक मेपासून काटेकोर अंमलबजावणी
‘व्यावसायिक वाहन चालकांनी प्रवाशांशी मराठी भाषेतून संवाद साधणे बंधनकारक करणारा निर्णय राज्य सरकारने सन २०१९ मध्येच घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ठोस पावले टाकली असून, १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करणार आहे’, असा निर्धार सरनाईक यांनी व्यक्त केला. Mumbai Metro 5A : ठाणे-कल्याणवासियांचा प्रवास वेळ निम्म्यावर, मुंबई मेट्रो 5A ला मंजुरी, 34 किमी लांबीवर 19 स्टेशन्स, पाहा मार्ग
सरनाईकांच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा
सरनाईक यांच्या या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शविला आहे. मराठी सक्तीला अमराठी चालकांनी विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मी मराठी बोलतो आणि मला मराठी समजतं, तुम्ही माझ्या रिक्षात बसू शकता’ असे स्टिकर्स मनसेकडून टॅक्सी आणि रिक्षांवर लावण्यात येणार आहेत. Delhi Crime : रात्री 10.30 ला विवाहित शेजारणीवर जबरदस्ती, सकाळी IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार करुन संपवलं; मित्राने खायला थांबवताच सटकला
मनसेचा धडा शिकवण्याचा इशारा
मराठी येत नाही आणि बोलणारही नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना मनसे धडा शिकवेल’, असे पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि मनसेच्या वाहतूक सेनेचे प्रमुख संजय नाईक यांनी जाहीर केले आहे.
Pratap Sarnaik | ‘मराठी येत नाही? आम्ही शिकू पण मराठी शिकावीच लागेल’; प्रताप सरनाईक ठाम
शाळांंची मान्यता रद्द करणार
वारंवार इशारे देऊनही मराठी न शिकवणाऱ्या शाळांविरोधात आता राज्य सरकारने दंड थोपटत मान्यता रद्द करण्याचे हत्यार उपसले आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठीत बोलण्याच्या सक्तीपाठोपाठ आता मराठी भाषा विभागाने याबाबतचा आदेशही काढलेला आहे. वास्तविक २०२० मध्येच महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डांच्या शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवण्याची सक्ती करण्यात आली होती, परंतु अनेकदा आदेश-इशारे दिल्यानंतरही विशेषत: खासगी इंग्रजी शाळा आणि ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ बोर्डाच्या शाळांकडून त्याचे पालन होत नसल्याचे उघड झाल्याने सरकारने कडक पवित्रा घेतलेला दिसत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा