Nashik Crime: नाशिकमधील पंचवटी आणि दिंडोरी रोड परिसरातील किमान चार नामांकित डॉक्टर खरातच्या संपर्कात होते, असंही तपासात निष्पन्न झालं आहे.
अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; रॅकेटमध्ये नामांकित डॉक्टरांचाही समावेश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. ज्या प्रकरणाला एका भोंदूबाबाकडून केली जाणारी फसवणूक म्हणून पाहिलं जात होतं, त्यामागे आता एक संघटित गुन्हेगारी रॅकेट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष पोलीस पथकाच्या तपासात जे खुलासे झाले आहेत, ते पाहून संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. स्वतःला ‘अवतारी पुरुष’ म्हणवून घेणारा अशोक खरात हा निरागस आणि अडचणीत सापडलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. कौटुंबिक कलह, नोकरीची समस्या किंवा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांना तो मानसिक आधाराचे आमिष दाखवत असायचा. मात्र, या आध्यात्मिक ओढ्यामागे त्याचा लैंगिक शोषण आणि आर्थिक लुटीचा काळा डाव दडलेला होता.
विशेष तपास पथकाच्या तपासात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना देवाचे रूप म्हटले जाते अशा उच्चशिक्षित डॉक्टरांचाही अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमध्ये सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा या डॉक्टरांच्या माध्यमातून पुरवला जात होता, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. भोंदू खरात याच्या सांगण्यावरून हे डॉक्टर वैद्यकीय नीतिमत्ता धाब्यावर बसवून महिलांच्या जीवाशी खेळत होते. नाशिकमधील एका दिग्गज राजकीय नेत्याचा डॉक्टर जावई याचा देखील या रॅकेटमध्ये सहभाग होता. राजकीय वजनाचा वापर करून या डॉक्टरने केवळ या अवैध कामांना संरक्षणच दिले नाही तर, यातून कोट्यवधींची माया जमा केली. धक्कादायक म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही एका बड्या नेत्याने या भोंदू खरातची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे तपासाची सुई आता बड्या नेत्यांकडे वळण्याची शक्यता आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भपात सुरू असताना मात्र संबंधित प्रशासनाला याबाबत कुठलीही माहिती कशी नव्हती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या एका बड्या आरोग्य अधिकाऱ्याचा अशोक खरातच्या या रॅकेटला थेट वरदहस्त होता. या अधिकाऱ्याच्या दबावामुळे आरोग्य विभागाने कधीही या संशयास्पद सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली नाही, अशी देखील माहिती आहे. आता या अधिकाऱ्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे. SIT च्या पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान,जप्त करण्यात आलेले फुटेज, कॉल डिटेल्स आणि पीडितांच्या जबाबावरून हे स्पष्ट झाले आहे की, हे केवळ एक स्थानिक रॅकेट नसून याचे धागेदोरे जिल्ह्याबाहेरही असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत नक्की कोणाकोणावर कारवाईचा फास आवळला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा