• Sun. Jun 7th, 2026
    Nashik Crime : ‘मला पण एक सिगारेट घे रे’; नकार देताच बेदम मारहाण, नाशिकमध्ये तरुणाला मध्यरात्री संपवलं

    Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकात एक मोठी घटना समोर आली आहे. सिगारेट न दिल्यानं एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

    पंचवटी सिगारेट न दिल्यानं तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : सिगारेट देण्यास नकार दिल्याचा राग आल्यानं तरुणावर चॉपरने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील पेठरोड परिसरात घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. राहुल कृष्णा राऊत (वय २७, रा. नवनाथ नगर, पेठ रोड) असं मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार

    शनिवारी (दि. १८) एप्रिल रात्री साडेनऊच्या सुमारास राहुल राऊत हा टिल्लू पवार व सुनील गुंजाळ या मित्रांसह नवनाथ नगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर (वय २६, रा. नवनाथ नगर) हा तेथे आला व त्याने राहुलकडे ‘मला पण एक सिगारेट घे रे’, अशी मागणी केली. मात्र, राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या रोहिदासने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान सोमवारी (दि. २०) एप्रिल पहाटे दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, राहुलचे वडील कृष्णा हरी राऊत यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
    Maharashtra TimesAmravati Crime : पीडितेची आई पुढे, अमरावती शोषण प्रकरणाला नवीन वळण, 18 व्हिडिओ 39 फोटोंसह आक्षेपार्ह मजकुराचा खच

    सराईत आरोपीचा शोध सुरू

    हल्ला करणारा रोहिदास आहेर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा तसेच म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडी, मारामारी आणि दहशत निर्माण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

    आदिशक्तीच्या दरबारात चोरी!

    लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदीमध्ये तफावत आढळून आली आहे. विशेष म्हणजे विश्वस्तांनी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी गर्भगृहातील चांदी काढल्याची बाब विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आली आहे.
    Maharashtra TimesNashik TCS Case: नाशिक महिला अत्याचार प्रकरण; तपासात कंपनीची मोठी चूक सापडली, कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता

    या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालिन अध्यक्ष, विश्वस्त व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहार झालेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा