Pahalgam Attack Kaustubh Ganbote Family : कौस्तुभ गनबोटे नेहमीच मुलाला जबाबदारीची जाणीव करून देत. ‘मी अचानक गेलो तर’ असा प्रश्न हलक्या फुलक्या शब्दांत ते विचारायचे; पण त्या वाक्यामागे दडलेली जाणीव आज खरी ठरल्याचं गनबोटे कुटुंबीय सांगतात.
गनबोटे कुटुंब(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : ‘घटना क्षणात घडली… आणि आमचं सगळं काही बदलून गेलं.’ जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. या घटनेला आज, बुधवारी वर्ष पूर्ण होत असताना, त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील वेदना आजही ओसरलेल्या नाहीत. मात्र, या दु:खातून सावरून त्यांनी उभ्या ठाकलेल्या जबाबदाऱ्या, आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
मन मान्य करायला तयार नाही
रास्ता पेठेतील ‘ गनबोटे फरसाण ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यवसायाचा आधारस्तंभ हरपल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात झाला. हल्ल्याच्या वेळी पत्नी संगीता गनबोटे या त्यांच्या सोबतच होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला तो भ्याड प्रकार आजही त्यांना विसरता आलेला नाही. ‘कौस्तुभ गेले, हे अजूनही मन मान्य करायला तयार नाही. प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते,’ असे सांगताना संगीता गनबोटे यांचा कंठ दाटून आला होता. Buldhana Crime : चार वर्षांपूर्वी जीव घेतला, बॉडी हॉटेलमागे खड्डा खणून पुरली, पण आरोपीच्या बायकोनेच बिंग फोडलं, ‘दृश्यम’पेक्षा सस्पेन्सफुल हत्येचा उलगडा
नोकरी सोडून ‘गनबोटे फरसाण’ची धुरा हाती
कौस्तुभ यांच्या जाण्यानंतर कुटुंबाची धुरा मुलगा कुणालने सांभाळली. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने वडिलांचा व्यवसाय हाती घेतला. आज तो कारखाना आणि दुकाने सांभाळत असून, कुटुंबीयांच्या मदतीने ‘गनबोटे फरसाण’ची परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. कौस्तुभ यांचे भाऊ अभिषेक व अभिजित; तसेच कुणालचे सासरे यांचेही या प्रवासात मोलाचे योगदान आहे. कौस्तुभ गनबोटे यांनी हयात असतानाच व्यवसायाची जबाबदारी योग्य पद्धतीने वाटून दिली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतही व्यवसायाचा गाडा रुळावर ठेवणे शक्य झाले. उलट, त्यांच्या शिकवणुकीनेच कुटुंबाला उभारी दिली आहे, अशी भावना संगीता यांनी व्यक्त केली.
Pahalgam Attack | हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, अजूनही भयानक आठवणी ताज्या, आजही डोळे पाणावतात
पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने गनबोटे कुटुंबीयांसाठी हा दिवस केवळ दुःखाचा नाही, तर जिद्दीने उभे जाण्याच्या प्रवासाचा साक्षीदार ठरत आहे. कौस्तुभ गनबोटे यांच्या सचोटीची आणि कष्टाळू वृत्तीची परंपरा पुढे नेत, कुटुंब आजही त्यांच्या आठवणींची शिदोरी जपत पुढे जात आहे. Bengaluru Crime : तुला वेस्टर्न स्टाईल प्रपोज करणारे, घरी कोणी नसताना ‘प्रेमाने’ बोलावलं, बेडला बांधलं; किरण फसला, प्रेयसीने जिवंत पेटवलं
अक्षय्य तृतीयेला आंबा खरेदीची हळवी आठवण
कौस्तुभ गनबोटे नेहमीच मुलाला जबाबदारीची जाणीव करून देत असत. ‘मी अचानक गेलो तर’ असा प्रश्न ते हलक्या फुलक्या शब्दांत विचारायचे; पण त्या वाक्यामागे दडलेली जाणीव आज खरी ठरल्याचे कुटुंबीय सांगतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीचा एक प्रसंग कुटुंबासाठी खास ठरला आहे. कौस्तुभ यांना आंब्यांची विशेष आवड होती. त्या दिवशी कुणाल आंबे आणण्यासाठी गेला. मात्र, वडिल आणायचे, त्यांना आवडायचे असे आंबे त्याला मिळाले नाहीत. घरी येऊन त्याने आईला विचारले, ‘बाबा माझी परीक्षा घेत आहेत का?’ हा साधा प्रसंग कुटुंबासाठी भावनिक आठवण बनून राहिला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा