महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे एसटी महामंडळासोबत पाच वर्षांचा करारात बांधले गेलेत रितेश आणि जिनिलीया यांना एसटीचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून घोषित केलं गेलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्यांचा उपस्थितीत बॅण्ड अॅम्बेसिडर या पदी रितेश आणि जिनिलिया यांची नियुक्ती करण्यात आली. याची अधिकृत माहीती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रितेश देशमुख उपस्थित होते आणि त्यांनीह आपली प्रतिक्रिया दिली.