• Sat. Jun 6th, 2026
    अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र; कोकणातील राहुल उसगावकरांचा थरकाप उडवणारा अनुभव

    Rahul Usgaonkar return from Strait Of Hormuz: राहुल घरी परतल्याने त्याचे आई-वडील आणि पत्नीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दुबईवरून आम्हाला विमानाने आणले गेले’, असे राहुलने सांगितले. जहाजावर असताना दोन हल्ले अगदी जवळून अनुभवल्याचेही त्याने नमूद केले.

    अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी : ‘आजूबाजूला एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, शेजारील जहाजांवर होणारे हल्ले अन् एकमेकांवर केले जाणारे ड्रोनहल्ले… होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण युद्धाच्या थराराचा, कोकणचा सुपुत्र राहुल उसगावकरने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.

    ‘दुबईत समोरच्या एका जहाजावर हल्ला झाला आणि आमच्या काळजात धस्स झाले’, असे त्याने नमूद केले. एका खासगी कंपनीच्या तेलवाहू जहाजाचा कॅप्टन असलेला राहुल नुकताच या जीवघेण्या युद्धस्थितीतून सुखरूप रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील गावी परतला.

    अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र, कोकणातील राहुलचा थरकाप उडवणारा अनुभव

    ‘२५ फेब्रुवारीला इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाले. दुर्दैवाने आम्ही त्याच दिवशी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पर्शियन आखातामध्ये प्रवेश केला होता. याच ठिकाणी आम्ही एक महिना होतो. या कालावधीत अंगावर काटा आणणारे भीतीदायक प्रसंग अनुभवले. ८८ हजार मॅट्रिक टन इतके अतिज्वलनशील तेल आमच्या जहाजात होते. अशातच आकाशात एकमेकांना धडकणारी क्षेपणास्त्रे, त्यांचे खाली येणारे अवशेष, हे दृश्य काळजात धडकी भरवणारे होते. पिण्याचे पाणी, अन्नाची कमतरता असताना या सगळ्या प्रसंगात आमचा महिना गेला. जहाजावरून आम्ही दोघे बाहेर पडलो. त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांपैकी आणखी आठ जण परतले.

    ‘एके दिवशी आमच्या बाजूच्या जहाजावर एक मानवरहित बोट आदळली. यावेळी मोठा स्फोट झाला आणि आम्हाला धडकीच भरली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. हल्ला झालेले ‘सेफ सी विष्णू’ नावाचे भारतीय कर्मचारी असलेले जहाज होते. हा पहिला मोठा हल्ला आम्ही पाहिला. त्यानंतर आमचे जहाज घेऊन आम्ही दुबईकडे निघालो. पर्शियन आखात परिसरातील जीपीएस सिस्टिम बंद करण्यात आली होती. अशा स्थितीत आम्ही पारंपरिक दिशादर्शक पद्धती वापरून धाडसाने दुबईपर्यंत आलो. याचवेळी आमच्या समोर असलेल्या एका जहाजावर मोठा हल्ला झाला.

    Maharashtra TimesRatnagiri Accident : भावाच्या लग्नाला जाताना काळाची झडप, बाईक चालवताना झोपेची डुलकी; भीषण अपघातात युवकाचा करुण अंत
    सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र जहाजाच मोठे नुकसान झाले. हे हल्ले आणि युद्धजन्य वातावरण पाहून कर्मचारी घाबरले होते. आम्ही कोणीही नीट झोपत नव्हतो. इतके भीतीदायक आणि तणावपूर्ण वातावरण होते, की कधी घरी कधी जाऊ, असे आम्हाला झाले होते’, असे राहुल म्हणाला. ‘जहाजाचा कॅप्टन म्हणून मी माझ्या क्रूला सगळे चित्र स्पष्टपणे दाखवत होतो. सर्व कर्मचाऱ्यांना सतत व्यग्र ठेवण्याचे दुसरे काम मी केले. त्यामुळे ही कठीण परिस्थिती हाताळू शकलो’, असेही त्याने सांगितले.

    Maharashtra TimesAmravati Crime : पीडितेची आई पुढे, अमरावती शोषण प्रकरणाला नवीन वळण, 18 व्हिडिओ 39 फोटोंसह आक्षेपार्ह मजकुराचा खच
    अद्यापही शेकडो जहाजे अडकलेलीच
    ‘युद्धस्थितीमुळे शेकडो जहाजे आजही होर्मुझच्या सामुद्रधुणीत अडकून पडली आहेत. यामध्ये आपल्या देशाची जवळपास ८० टक्के जहाजे असू शकतात. होर्मुझच्या सामुद्रधुणी दूधणी हा फार मोठा परिसर नाही. ३० नॉटिकल माइल इतकी त्याची लांबी आहे. जास्तीत जास्त १० तासांत हा टप्पा पार करता येतो जवळपास ६० टक्के तेलवाहतूक याच सामुद्रधुनीतून होते’, होते’, अशी माहिती राहुल यांनी दिली

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा