Nashik Crime: संशयित निदा खान ही पसार असून, गर्भवती असूनही तिच्यावरील गंभीर आरोपांमुळे न्यायालयाने तिला अद्याप अटकेपासून संरक्षण दिलेले नाही.
नाशिक महिला अत्याचार प्रकरण; तपासात कंपनीची मोठी चूक सापडली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी – कंपनीच्या नाशिक कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त महिला असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांची स्वतंत्र ‘पॉश’ समिती असणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीने पुणे व नाशिक येथील कार्यालयांसाठी एकच समिती नेमली होती. त्यातील सदस्य संशयित अश्विनी चैनानी ही नाशिक कार्यालयात दोन महिन्यांतून एकदा यायची. त्यावेळी पीडितांनी तिच्याकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, चैनानीने दुर्लक्ष केले होते. चैनानी या गुन्ह्यात संशयित असून, राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीने गंभीर दखल घेतली. स्वतंत्र समिती नसल्याने पीडितांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याची नोंद समितीने केल्याचे कळते. पोलिस तपासातही हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नातील विविध नऊपैकी सहा गुन्ह्यांत आतापर्यंत संशयितांना अटक झाली असून, उर्वरित तीन गुन्ह्यांत लवकरच अटकेची शक्यता आहे. संबंधित कंपनीच्या नाशिक कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त महिला कार्यरत होत्या. मात्र, तरीही पुणे व नाशिकसाठी कंपनीने एकच ‘पॉश’ (लैंगिक छळ प्रतिबंधक समिती) समिती ठेवल्याने पीडितांच्या तक्रारींची अपेक्षित दखल घेण्यात आली नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
कंपनीतील प्रकरणांबाबत शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिसांत आठ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी आहे. त्यानुसार संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, शफी शेख, कंपनीची ‘असिस्टंट जनरल मॅनेजर’ अश्विनी चैनानी हे नाशिक रोड कारागृहात आहेत.
देवळाली कॅम्प पोलिसांतील बलात्कार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात संशयित दानिश व तौसिफच्या जामीन अर्जावर २ मे रोजी सुनावणी होईल. त्याच गुन्ह्यातील संशयित निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २७ एप्रिलला सुनावणी होईल. मुंबई नाका पोलिसांतील १६४ व १६५ तसेच १६९ व १७१ या क्रमांकाच्या गुन्ह्यांत संशयितांचे नाशिक जिल्हा न्यायालयात अद्याप जामीन अर्ज दाखल झालेले नाहीत.
‘सक्तीची चौकशी करा’
‘आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जबरदस्तीने राजीनामा देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करावी. एचआर नियम आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या पद्धतींचे नियमन झाले पाहिजे, असे सक्त निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आयटी पार्क मधील विविध कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री बोलत होते. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांत झालेल्या जबरदस्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री फुंडकर यांनी कंपन्यांमध्ये असे काही प्रकार घडल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश दिले. मंत्री फुंडकर म्हणाले, ‘या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यासगट स्थापन करण्यात यावा.’
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा