Tuljapur Unseasonal Rain: रस्त्यांवर बर्फाचे थर साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली, तर काही काळ वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली होती.
मंगळवारी दिवसभर उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत होता. सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. तुळजापूरपासून साधारण १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या धारूर परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तर अवघ्या काही वेळातच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
Marathwada Farmer Death Cases: भीषण वास्तव! मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना?
या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके भूईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, मोठ्या आकाराच्या गारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घराचा आसरा घेतला. मात्र, दुसरीकडे निसर्गाचे हे रौद्र पण ‘पांढरे’ रूप पाहून अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या दृश्यांचे चित्रीकरण केले असून, सोशल मीडियावर याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जणांना नगरसेवकपदाची लॉटरी, कुणाकुणाला मिळाली संधी?
दरम्यान, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी समाजमाध्यमावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नुकसानीचे पंचनाम्याचे आदेशही देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत पुन्हा वादळ, जोरदार वारा, पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी,असे प्रशासनाने नमूद केले आहे.
