• Fri. Jun 12th, 2026
    Saptashrungi Devi Temple: आदिशक्तीच्या दरबारात चोरी! सप्तश्रृंगीच्या गर्भगृहातील प्रकार, तब्बल 23 किलो चांदी गायब, कोणाचं कारस्थान?

    Vani Saptashrungi Devi Temple: राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिरात नक्षीकामातील सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदीमध्ये तफावत आढळून आली आहे.

    आदिशक्तीच्या दरबारात चांदीचोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदीमध्ये तफावत आढळून आली आहे. विशेष म्हणजे विश्वस्तांनी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी गर्भगृहातील चांदी काढल्याची बाब विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आली आहे.

    या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालिन अध्यक्ष, विश्वस्त व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहार झालेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    Maharashtra TimesNashik TCS : ‘प्लेयर’ नावाने हिणवायचे, ‘तुझ्या नवऱ्यापेक्षा मी छान आहे, माझ्यासोबत बाहेर चल’; नाशिक TCS प्रकरणात पीडितेच्या जबाबाने मोठे खुलासे
    गर्भगृहातील नक्षीकामासाठी पूर्वीच्या नोंदीनुसार सुमारे ४०६ किलो चांदी वापरली असताना, प्रत्यक्ष मोजणीत ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले. त्यामुळे अपहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत द्यानद्यान यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

    विभागीय आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी चौकशीबाबत आदेश काढले आहेत. सप्तशृंगी ट्रस्टमधील चांदीच्या अपहार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयानेही सहाय्यक जिल्हाधिकारी (कळवण), तहसीलदार कळवण तसेच ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या माध्यमातून हे आदेश काढण्यात आले आहेत. या प्रकरणी भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी द्यानद्यान यांनी केली आहे.
    Maharashtra TimesNashik Lift Collapsed: तिसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून चौघे जखमी; नाशकात मायलेकाचे पाय फ्रॅक्चर, वायर रोप तुटल्याने दुर्घटना
    त्र्यंबकेश्वरप्रमाणे व्हावी चौकशी
    श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी विश्वस्तांकडून केल्या जाणाऱ्या काळाबाजाराचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरप्रमाणेच या ठिकाणी चौकशी केल्यास तत्कालीन विश्वस्तांचा मोठा गैरकारभार उघडकीस येण्याची शक्यता आहे. माजी विश्वस्तांकडून अनेक चुकीचे प्रकार घडले असून, चौकशीतून ते उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांकडूनही गेल्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली जात आहे.
    Maharashtra TimesSudhakar Badgujar: नाशिक महापालिकेच्या करवसुलीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; सुधाकर बडगुजरांचा गंभीर आरोप
    अंधारात काढली चांदी
    सप्तशृंगी ट्रस्टने १५ सप्टेंबर २०२१ रोजी ठराव करून चांदी दिवसा काढण्याचे नियोजन केले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या वेळी मूल्यमापकाच्या अनुपस्थितीत गर्भगृहातील चांदी उतरविण्यात आली. यासंदर्भात ट्रस्टचे व्यवस्थापक दहातोंडे यांनी अध्यक्ष आणि धर्मादाय आयुक्तांना दिलेले पत्र (जावक क्र. २०२१-२२-२८५) मोठा पुरावा ठरल्याचे समोर आले आहे. त्याचा मनात राग धरून विश्वस्तांनी दहातोंडेंच्या विरोधात कटकारस्थान करून त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा गडावर सुरू आहे.

    मंदिरातील चांदी ही भाविकांच्या श्रद्धेची ठेव आहे. तिच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच गैरप्रकार होत असल्याचा संशय असेल तर ते समाजासाठी धोक्याचे आहे. या प्रकरणी सत्य बाहेर यावे. – विठोबा द्यानद्यान, सामाजिक कार्यकर्ते

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा