Poonam Moon Murder Case: पुण्यात 16 एप्रिल रोजी एका वकिलाच्या पत्नीने त्याच्या सेक्रटरीला निघृणपणे संपवलं होतं. त्या रात्री ऑफीसमध्ये नेमकं काय घडलं हे आता समोर आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे: पुण्यातील चंदननगर परिसरात घडलेली पूनम मुन या सेक्रेटरीच्या हत्येची ही घटना म्हणजे ऑफिसमध्येच घडलेला भीषण थरार आहे. 16 एप्रिल 2026 रोजी कामाच्या ठिकाणी जे घडलं, ते ऐकून अंगावर काटा येतो. पतीसोबत संबंध असल्याच्या संश्यावरुन भाजपचे पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष असलेल्या वकील संजय सावंत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेतील मृत महिला सेक्रेटरी पूनम मुन चे पती दिवसभर रात्रभर पत्नीचा शोध घेत राहिले मात्र पत्नीचा मृतदेह त्यांना तिच्याच ऑफिसमध्ये गोणीत सापडला आणि त्यांना धक्का बसला. पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोपीना अटक केली आहे.
Pune Crime : पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, मग बॉडी ऑफिसमध्येच का ठेवली? पोलीस तपासात कारण समोर
त्यादिवशी ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं?
दुपारच्या सुमारास पूनम दिनेश मून नेहमीप्रमाणे ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. पण त्या दिवशी वातावरणात काहीतरी तणाव जाणवत होता. काही वेळातच संजय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत आपल्या अल्पवयीन मुलीसोबत थेट ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये पाय ठेवताच स्वाती सावंत आणि पूनम मून यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. सुरुवातीला बोलाचाली, मग आरोप-प्रत्यारोप आणि काही क्षणातच वातावरण पूर्णपणे तापलं.
ऑफिसमध्ये उपस्थित कर्मचारीही गोंधळून गेले. आवाज वाढत गेला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. संतापाच्या भरात स्वाती सावंत यांनी पूनम यांच्या डोळ्यांवर रसायन फवारलं. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पूनम काहीच पाहू शकल्या नाहीत आणि गोंधळून गेल्या. त्या अवस्थेतच त्यांना पकडून एका जागी बसवण्यात आलं आणि त्यानंतर बॅटणे जोरदार मारहाण सुरू झाली. ऑफिसमधील वस्तूंचा वापर करून त्यांना बेदम मारलं गेलं. ते इथेच थांबली नाही. त्यानंतर कोयत्याने पूनम मून यांच्यावर अनेक वार करण्यात आले. तपासात 56 पेक्षा जास्त वार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत काही मिनिटांतच ऑफिसमध्ये रक्ताचा सडा पडला आणि पूनमचा मृत्यू झाला.
मृतदेह लपवण्याचा प्रयत्न
तपासानुसार या संपूर्ण घटनेदरम्यान संजय सावंत आणि त्यांची अल्पवयीन मुलगीही उपस्थित होती आणि या प्रसंगात सहभागी असल्याचं म्हटलं जात आहे. हत्यानंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून ऑफिसबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. पण भीती आणि घाईमुळे तो प्लॅन फसला. शेवटी मृतदेह ऑफिसमध्येच सोडून सर्वजण निघून गेले.
Pune Crime : पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, पुण्यात दाम्पत्यासह 13 वर्षांची मुलगीही ताब्यात
दरम्यान घटनेच्या दिवशी पूनम मुन यांचे पती दिवसभर पत्नीचा शोध घेत राहिले रात्रभर शोध घेतला त्यांना उडवाडवीची उत्तरे देण्यात आली आणि त्यांच्या पत्नीचा काटा काढला गेला. पूनम मून घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता पती दिनेश मुन यांच्यासमोर भयानक प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून संशयितांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. सखोल तपासात काय बाबी समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा