“मला शरद पवारांचा फोन आला होता, त्यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलाय”, असा मोठा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या सांगता सभेत केला. अजितदादांच्या आठवणीने फडणवीस आणि सुनेत्रा पवार दोघेही भावूक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
‘शरद पवारांनी सुनेत्रा वहिनींना पूर्ण समर्थन दिले’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभेत माहिती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्ताने बारामतीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना सर्वांनी समर्थन दिले असे सांगताना त्या, अजित दादांच्या प्रमाणेच पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र राज्याला सुयोग्य नेतृत्वातील नेतृत्व देतील असा आशावाद व्यक्त केला. फडणवीस यांनी या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला देखील फोन केला आणि आमच्या पक्षाचे सुनेत्रा पवारांना पूर्ण समर्थन असेल अशी ग्वाही दिली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवारांच्या कार्याची चित्रफीत
आज बारामतीत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली. तेव्हा उपस्थित सर्वांना अनावर झाले होते. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस देखील भावुक झाले होते. त्यांनी भाषणात देखील माझे मोठे बंधू असा अजित पवारांचा उल्लेख केला. अजित पवार यांनी केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख करत त्यांची प्रस्तावित कामे देखील फडणवीस यांनी नमूद केली.
फडणवीसांचा आशावाद
या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत जरी विरोधी उमेदवार कोणी उभे असले तरी मी टीका करणार नाही, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते उभे राहिलेले आहेत. असा उल्लेख करत देशात विक्रम होईल अशा स्वरूपाचे मतदान करा आणि सुनेत्रा पवार यांच्या विजयाने देशात कधीही न मोडता येणारा मताधिक्याचा विक्रम होईल, असा देखील आशावाद व्यक्त केला.
Sunetra Pawar : ‘विकासाचा पाया साहेबांनी रचला आणि दादांनी त्यावर कळस चढवला’; सांगता सभेत सुनेत्रा पवारांकडून शरद पवारांचा उल्लेख
फडणवीस यांच्या भाषणापूर्वी उमेदवार सुनेत्रा पवार यांचे भाषण झाले. यावेळी अजित पवारांचा उल्लेख झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात पाणी आले ते भावुक झाल्या होत्या.
शरद पवारांचे सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन
अजित पवार यांच्या निधनामुळे होत असलेल्या बारामती पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असल्याने, १९६७ नंतर प्रथमच शरद पवार मतदानाला मुकणार आहेत. “डॉक्टरांच्या सक्त विश्रांतीच्या सल्ल्यामुळे मी प्रत्यक्ष येऊ शकत नाही, मात्र बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींना भरघोस मतदान करून अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त करत बारामतीकरांना साथ देण्याची विनंती केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा