Nashik TCS Company Abused Case : नाशिक टीसीएसमधल्या पीडितेच्या जबाबातून पुन्हा एकदा अनेक संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.
नाशिक टीसीएस कंपनी प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिक येथील नामांकित टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. कंपनीतील संशयित आरोपींचा गट नवीन रुजू होणाऱ्या तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी अश्लील शेरेबाजी आणि धार्मिक अपमानाचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचे पोलीस तपासात उघड झालेले असताना, आणखी एक माहिती समोर आली आहे.
‘तुझा नवरा बाहेर असतो, तुला भीती वाटत नाही का?’
पीडित तरुणी प्रशिक्षणात असताना टीम लीडर संशयित रझा मेमन हा तिच्या खासगी आयुष्याबद्दल अश्लील विचारणा करायचा. ‘तुझा नवरा बाहेर असतो, तुला भीती वाटत नाही का?’ असं प्रश्न विचारत तो तिला प्लेयर या नावाने हाक मारून हिणवायचा. तर दुसऱ्या बाजूला असिफ अन्सारी याने पीडितेच्या शारीरिक बाबींवर घाणेरड्या कमेंट्स करत, ‘तुझ्या नवऱ्यापेक्षा मी छान आहे, माझ्यासोबत बाहेर चल,’ अशी मागणी केली. Satatra Accident : नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाची झडप, पती जागीच ठार, पत्नीनं वाटेत जीव सोडला, 10 दिवसांपूर्वीच झालेला विवाह
‘…म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात,’
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोपींनी केलेला धार्मिक छळ आहे. असिफ अन्सारी याने, ‘तुमच्या हिंदू धर्मात स्त्रिया बुरखा घालत नाहीत, म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात,’ असं विधान करून पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचं पीडिताने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच, तौसिफ अत्तार याने काम शिकवण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे केले. पीडितेने प्रतिकार केला असता, तिला कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी देखील पाच जणांवर गुन्हा दाखल असून जून 2025 ते मार्च 2026 या काळात शाहरूख कुरेशी, रझा मेमन, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार आणि शफी शेख यांनी पीडितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या या प्रकारामुळे नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. Latur Crime : कौटुंबिक वादाला कंटाळली, विवाहितेनं पोटच्या दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं; एकाचवेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार
नाशिक शहरासह संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या शहरातील नामांकित कंपनीत समोर आलेल्या धर्मांतरण आणि महिला कर्मचारी लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर येत आहे. SIT पथकाच्या हाती संशयित आरोपींचे मोबाईल लागले असून, त्यातील व्हॉट्सअॅप चॅटमधून महिला आणि तरुणींचा कशा प्रकारे छळ केला जात होता, याचे काही पुरावे मिळाले आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा