Nashik Crime: कार्यालयात काम करणाऱ्या महिलांना हा पासवर्ड वापरणे भाग पाडून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा निंदनीय प्रकार सुरू होता, असंही स्पष्ट झालं आहे.
वायफायचे घाणेरडे पासवर्ड, विकृतीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; नाशिकमधील TCS प्रकरणाच्या तपासात नवा खुलासा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिक शहरासह संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या शहरातील नामांकित कंपनीत समोर आलेल्या धर्मांतरण आणि महिला कर्मचारी लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर येत आहे. SIT पथकाच्या हाती संशयित आरोपींचे मोबाईल लागले असून, त्यातील व्हॉट्सअॅप चॅटमधून महिला आणि तरुणींचा कशा प्रकारे छळ केला जात होता, याचे काही पुरावे मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आणि ग्रुप लीडरने एक विशेष व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवर तो दररोज जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक मेसेज पाठवत असे. या मेसेजेसचा मुख्य उद्देश हा कामाच्या ठिकाणी असलेल्या तरुणींना आणि महिलांना मानसिकदृष्ट्या त्रास देणे हा होता. तरुणींचे मनोबल खच्ची करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
केवळ मेसेजवर न थांबता आरोपांनी विकृतीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. कार्यालयातील वायफायचा पासवर्ड दररोज बदलला जात असे. हा पासवर्ड सेट करताना तो अत्यंत अश्लील शब्दांत किंवा विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीने ठेवला जात होता.
या प्रकरणात केवळ छळवणूकच नव्हती, तर पीडित महिलांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यांना बळजबरीने धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा मोठा कट रचला गेल्याचा देखील आरोप आहे. या गंभीर गुन्ह्याखाली अटकेत असलेले आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमधील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे SIT आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात होता का? हे शोधण्यासाठी पोलीस या आरोपींना पुन्हा कोठडीत घेऊन त्यांची सखोल चौकशी करणार आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या तपासाची गती पाहता, आगामी काळात या प्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा