Jalgaon Youth Murder : प्रदीप माळीची हत्या झाल्यानंतर साडेसात वाजता त्याची बॉडी आढळली, पण सुरुवातीला त्याची ओळख पटत नसल्याने हातावरील टॅटू आणि खिशात सापडलेल्या लग्नपत्रिकेवरून उलगडा झाला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : जुन्या वादातून 32 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याच्या घटनेने जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर हादरुन गेले आहे. सुरुवातीला तरुणाची ओळख पटत नसल्याने टॅटू आणि लग्नपत्रिकेचा आधार घ्यावा लागला. त्यानंतर घटनेचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दोघे आरोपी फरार झाले आहेत.
चोपडा शहरातील तिरंगा चौकाजवळ हतनूर पाटचारी परिसरात प्रदीप राजेंद्र माळी (वय 32) या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी चेतन सुभाष कानडे (रा. पाटील गढी) याला धानोरा गावाजवळ ताब्यात घेतले असून दोन आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघं दिसले
प्रदीप माळी हा तरुण हमालीचे काम करत होता. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून तो बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनी प्रदीप माळी याच्यासोबत विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दुचाकीवरुन जाताना दिसून आले. Udhna Station : सुरतमधील स्टेशनवर 23000 प्रवाशांची गर्दी, तरुण म्हणाला ‘आता परत कधीच येणार नाही’; ट्रेन पकडण्यासाठी धावाधाव कशाला?
तरुण आणि आरोपीत जुना वाद
13 मार्च रोजी चेतन कानडे याने मयत प्रदीपची पानटपरी जाळली होती. ज्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या जुन्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Jay Pawar यांच्या सोबत अमोल मिटकरी प्रचारात, सुनेत्रा पवारांसाठी बारामती एकवटली
लग्नपत्रिका आणि टॅटूवरुन ओळख पटली
प्रदीप माळीची हत्या झाल्यानंतर साडेसात वाजता त्याची बॉडी आढळली होती. मात्र सुरुवातीला त्याची ओळख पटत नव्हती, तेव्हा अंगावरील कपडे, हातावरील टॅटू आणि खिशात सापडलेल्या लग्नपत्रिकेवरून ओळख निश्चित झाली. प्रदीपचे वडील राजेंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत चेतन कानडे हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Dosa Batter Death : मुलींचे व्हिसेरा रिपोर्ट आले, शरीरात विषाचा अंशही नाही; डोसा पीठ मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, आता लाय डिटेक्टर चाचणी
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
प्रदीप माळी याचं शव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, त्यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मृताचे शवविच्छेदन जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार असून आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याने उपजिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा