• Sat. Jun 6th, 2026
    गरोदर निदा खानच्या वतीने 40 मिनिटं युक्तिवाद, पण दिलासा नाहीच, अटकेची टांगती तलवार कायम, कोर्टाचा मोठा निर्णय

    Nashik TCS Nida Khan : निदा खान तीन महिन्यांची गर्भवती असून ‘एसआयटी’ने मुंब्र्यात तिच्या पतीचा जबाब नोंदवला आहे. निदाच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी ४० मिनिटं युक्तिवाद केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नातील नऊपैकी चार गुन्ह्यांत सहा पुरुष संशयितांनी जामिनासाठी, तर एका महिलेने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी पसार असलेली संशयित निदा खान हिला न्यायालयाने दिलासा दिला नसून, तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तर, कंपनीची ‘एजीएम’ अश्विनी चैनानी हिचा सोमवारी (दि. २०) रात्री उशिरापर्यंत जामीन अर्ज दाखल झालेला नव्हता.

    कोर्टात ‘इन कॅमेरा’ सुनावणी

    बहुराष्ट्रीय कंपनीतील विनयभंगाच्या गुन्ह्यात दुसऱ्यांदा अटक झालेले रझा मेमन व शफी शेख यांना सोमवारी (दि. २०) न्यायालयात हजर करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांच्या न्यायकक्षात ‘इन कॅमेरा’ सुनावणी झाली. त्यावेळी ‘एसआयटी’तील तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी तपासातील मुद्दे स्पष्ट केले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक संचालक किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला. तर, संशयितांच्या बाजूने वकील बाबा सय्यद, हानिद शेख यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने रझा आणि शफी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणांबाबत शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी आहे. त्यानुसार संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, शफी शेख, कंपनीची ‘असिस्टंट जनरल मॅनेजर’ अश्विनी चैनानी हे संशयित नाशिकरोड कारागृहात आहेत. तर संशयित निदा खान ही अद्याप पसार आहे.

    Chitra Wagh | फडणवीसांच्या आव्हानाला सुळेंचं उत्तर, चित्रा वाघ यांचा सुळेंना डिवचण्याचा प्रयत्न

    Maharashtra TimesDosa Batter Death : मुलींचे व्हिसेरा रिपोर्ट आले, शरीरात विषाचा अंशही नाही; डोसा पीठ मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, आता लाय डिटेक्टर चाचणी

    समितीचा गोपनीय संवाद

    कंपनीच्या लैंगिक छळ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेत तथ्य शोध समिती नेमली आहे. ही समिती दोन दिवस नाशिकमध्ये असताना त्यांनी कंपनीत जाऊन घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली. यासह पीडितांसोबत समितीतील फक्त महिला सदस्यांनी गोपनीय संवाद साधला. पीडितांनी पोलिसांना दिलेले जबाब, कंपनीतील घडलेले प्रकार, यापूर्वीच्या तोंडी तक्रारी, कंपनीतील ‘पॉश’ समिती, तिची कार्यपद्धती याबाबत माहिती संकलित करण्यात आली. त्याबाबत आयोगाला लवकरच सविस्तर अहवाल सादर होणार आहे. समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे माजी पोलिस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक लीलावती यांचा समावेश आहे.
    Maharashtra TimesUdhna Station : सुरतमधील स्टेशनवर 23000 प्रवाशांची गर्दी, तरुण म्हणाला ‘आता परत कधीच येणार नाही’; ट्रेन पकडण्यासाठी धावाधाव कशाला?

    निदा खानच्या वतीने ४० मिनिटं युक्तिवाद

    देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल अत्याचार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्या गुन्ह्यातील पसार संशयित निदा एजाज खान हिने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल आहे. त्यावर सोमवारी (दि. २०) नाशिकरोड न्यायालयात सुनावणी झाली. निदा ही तीन महिन्यांची गर्भवती असून ‘एसआयटी’ने मुंब्र्यात तिच्या पतीचा जबाब नोंदवला आहे. निदाच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. चाळीस मिनिटांच्या युक्तिवादानंतर सरकारी वकील आणि पीडितेचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल. तोपर्यंत निदा हिला अंतरिम दिलासा (अटकेपासून संरक्षण) नसेल, असे आदेश न्यायालयाने दिले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा