• Wed. Jun 17th, 2026

    Kolhapur News: आईसोबत वैष्णवी शाळेत निघाली, पण क्षणात सर्व संपलं; वाटेत भिंत कोसळून मुलीसह एका प्राध्यापिकेचा मृत्यू

    Kolhapur News: आईसोबत वैष्णवी शाळेत निघाली, पण क्षणात सर्व संपलं; वाटेत भिंत कोसळून मुलीसह एका प्राध्यापिकेचा मृत्यू

    Wall Collapses in Kolhapur: कोल्हापूरात सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी शाळा व महाविद्यालयात जाताना वाटेत भिंत कोसळून शाळकरी मूलगी आणि प्राध्यापिकेचा करूण अंत झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात आज सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत महाविद्यालयीन प्राध्यापिका व शाळकरी मुलीचा अंगावर भिंत कोसळून जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर गडहिंग्लज येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आजरा-महागाव रस्त्यावरील वाणी गल्ली किंवा लिंगायत गल्ली परिसरात डॉ. देशपांडे यांच्या जुन्या घराची दक्षिणेकडील भिंत जेसीबी मशीनने पाडण्याचे काम सुरू असताना अचानक ती रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या तिघा महिलांवर भिंतीचा मोठा ढिगारा पडला, ज्यामुळे वैष्णवी तुकाराम भोसले (इयत्ता सहावी, वय 14 वर्षे) आणि प्रा. ज्योती नितीन कुंभार (वय 45 वर्षे, प्राध्यापिका) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. वैष्णवीची आई ललिता तुकाराम भोसले (वय 42 वर्षे) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

    कसा घडला अपघात?

    मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 11 वाजता आजरा शहरातील वाणी गल्लीत डॉ. देशपांडे यांच्या जुन्या घराचे पाडकाम सुरू होते. जेसीबीच्या सहाय्याने दक्षिणेकडील भिंत पाडली जात असताना अचानक संतुलन बिघडले आणि ती रस्त्यावर कोसळली. त्याच क्षणी रस्त्यावरून शाळेला जात असलेली वैष्णवी भोसले, तिची आई ललिता आणि परिसरातील महाविद्यालयीन प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार या तिघी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्या. परिसरातील नागरिकांनी ओरडा ऐकून तात्काळ धाव घेतली आणि हाताने ढिगारा हाताळून तिघींना बाहेर काढले. वैष्णवी आणि ज्योती या दोघींचा जागीच मृत्यू झाल्याचे निदान वैद्यकीय पथकाने केले, तर ललिता यांना तात्काळ गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची स्थिती गंभीर असली तरी धोक्याबाहेर आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल पाटील यांनी दिली.Maharashtra TimesCrime News: वडिलांचं निधन, कुटुंबाची जबाबदारी, पण आदित्यला नको तो नाद लागला; 24 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं!
    दुर्घटनेनंतर आजरा नगराध्यक्ष अशोक चराटी, डीवायएसपी, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते, मंडल अधिकारी सुंदर जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल पाटील आणि सर्व नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी नियंत्रणात आणली आणि ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याची शोधमोहीम राबवली. प्राथमिक तपासात पाडकामादरम्यान सुरक्षा उपाययोजना अपुरी असल्याचे निदर्शनास आले असून, पोलिसांनी जेसीबी चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.

    Maharashtra TimesKolhapur Accident: भरधाव स्पोर्ट्स बाईकची धडक, माजी नगरसेवकाचा मुलगा हवेत उडून फेकला गेला; उपचारादरम्यान सोडले प्राण

    प्रशासनाकडून नियम लागू

    या दुर्दैवी घटनेमुळे आजरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. वैष्णवी ही स्थानिक शाळेतील हुशार विद्यार्थिनी होती, तर प्रा. ज्योती कुंभार या कुशल शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठा आघात बसला आहे. वैष्णवी शाळेला जात असताना ही घटना घडली. नागरिकांनी पाडकामाच्या कामासाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक नियम लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा