• Thu. Jun 18th, 2026
    Operation Tiger UBT Spilt : लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला सकारात्मक संकेत, ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत दाखल होणार!

    Six Shiv Sena MP Join Shinde Group : अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिल्याची बातमी समोर येत आहे.

    ऑपरेशन टायगर शिवसेना उद्धव ठाकरे सहा खासदार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील सहा खासदारांची फूट आता उघडपणे दिसू लागली आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे लोकसभेतील नऊपैकी केवळ तीनच खासदार उपस्थित होते. यामध्ये अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. उर्वरित सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या पक्षांतरावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचदरम्यान, आता मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदास अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत. सहा खासदारांचा गट आता शिवसेनेत विलीन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कार्यालयात याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

    सहा खासदारांचा गट आता लवकरच शिवसेनेत विलीन

    ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार अखेर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार आहे. सहा खासदारांचा एक स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला होता. दरम्यान, या गटस्थापनेला लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला मंजुरी मिळाली आहे. या सहा खासदारांचा गट आता लवकरच शिवसेनेत विलीन होणार आहेत. गट स्थापनेला मंजुरी मिळाल्यानं विलिनीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या मंजुरीनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीसाठी संसद भवनात दाखल झाले आहेत. Maharashtra TimesSanjay Raut: संजय राऊतांचा संयम ढासळला, फुटलेल्या खासदारांना थेट शिवीगाळ; फक्त तीनच खासदार ठाकरेंसोबत राहिले!

    संयज राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

    ‘खासदार-आमदार येतात-जातात. आज आम्ही खासदार आहोत, उद्या नसू. पण या पक्षानं आम्हाला जे दिलंय, ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा सर्वांना मुलासारखं वाढवलं, उद्धव ठाकरेंनी आमच्यावर सातत्याने भावासारखं प्रेम केलं, हे लोक जे पक्ष सोडून जात आहेत, ते बेईमान आहेत आणि बेईमानी त्यांच्या रक्तात आहे, असं आता आम्हाला वाटायला लागलं आहे. मी कोणत्याही पक्षाचं किंवा व्यक्तीचं नाव घेत नाही,’ अशा शब्दांत राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच पक्षांतराच्या तयारीत असणाऱ्या खासदारांना संजय राऊत यांनी आक्रमक इशाराही दिला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा