• Thu. Jun 18th, 2026
    Sushma Andhare: मला एका खासदाराचा फोन आलेला, दोन खासदार पक्षफोडीचे म्होरके; नाव घेत सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप

    पुणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघाती आरोप करत फुटण्याच्या तयारीत असणाऱ्या खासदारांचा समाचार घेतला आहे. शिवसेना खासदार फुटीच्या मोहिमेचे संजय देशमुख हे कॅप्टन असून नागेश पाटील आष्टीकर हे व्हाइस कॅप्टन आहेत, असा दावा अंधारे यांनी केला आहे.

    सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, “नागेश पाटील आष्टीकर हे ठरवून सगळ्यांना वेड्यात काढायचा प्रयत्न करत होते. आष्टीकरांना वाटतं की ते सगळ्यात मोठे तीस मार खान आहेत. पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या आणि संजय देशमुख यांच्या चाललेल्या जेवणावळी आणि अगदी परवाच्या रात्री ओव्हरस्मार्ट बनत त्यांनी मला आणि पक्ष नेतृत्वाला केलेला कॉल हे सगळं आम्ही समजून उमजून आहोत. या सगळ्या पक्षफोडीच्या मोहिमेचे कॅप्टन संजय देशमुख तर व्हाइस कॅप्टन नागेश आष्टीकर आहेत,” असा आरोप अंधारे यांनी केला आहे.

    सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

    पक्षफुटीवरून भाजपवर निशाणा साधत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “दिल्लीत आमच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. गेले काही दिवस चर्चा सुरू होत्या, काही लोक गट तयार करत आहेत, अशा चर्चा होत्या. भाजपने ठरवलंय की, प्रत्येक प्रादेशिक पक्षातील काही लोक वेगळे करायचे, गट तयार करायचा आणि त्यांनी भाजपला पाठिंबा द्यायचा. डी लिमिटेशनला पाठिंबा द्यायचा. ममता बॅनर्जी, शरद पवार यांची काय चूक होती? चूक असलीस तर हीच होती की ते प्रादेशिक अस्मिता जपत होते. आमच्याकडे आला तर निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन दिलं जातंय, स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातोय,” असा हल्लाबोल अंधारे यांनी केला.

    ओमराजे निंबाळकरांवर घणाघात

    धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा अनेकांसाठी धक्कादायक आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी खासदार निंबाळकरांचा समाचार घेतला आहे. “ओमराजे कुठे आहेत, असा संभ्रम होता. कालपासून चर्चा सुरू होती. काल रात्री पुण्यात चार्टर विमान आलं, त्याचे नेतृत्व तानाजी सावंत करत होते. यामध्ये जे लोक होते त्यामध्ये नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, जय राजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर होते. ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल २० तारखेला येणार आहे. त्यांना त्याबाबत काही आश्वासन दिले आहे का? तुमचा राजकीय विरोधकांनी संपवून टाकू असा काही शब्द मिळाला आहे,” असा आरोप अंधारे यांनी केला आहे.

    शिवसैनिकांना आवाहन

    राज्यभरातील शिवसैनिकांना घरात घुसून फुटलेल्या खासदारांना जाब विचारावा, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं आहे. “राज्यातील शिवसैनिकांना आवर्जून सांगेन की, यावेळीचं मतदान हे आमच्या ताकदीवर घेतलेले आणि शिवसैनिक यांचे मतदान आहे. शिवसैनिकांना या लोकप्रतिनिधीच्या घरात घुसून जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असं त्या म्हणाल्या.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed