• Fri. Jun 19th, 2026
    Abhijeet Dipke: राजकीय पक्ष काढणार नाही; विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत राहणार, दीपके यांची भूमिका

    Cockroach Janta Party Abhijeet Dipke: प्रत्येकालाच राजकारणात यावे लागत असेल तर ज्यांना निवडून दिले ते काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली.

    अभिजीत दीपके(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी, बेरोजगारांसाठी आम्ही आंदोलन करू; मात्र त्यासाठी राजकीय पक्ष काढावा लागणार असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्देव नाही’, असे स्पष्ट करीत राजकारणात येण्याचा मानस नसल्याचे कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी नागपुरात स्पष्ट केले.

    नीट परीक्षा पेपरफुटी, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यावरून देशभरात आंदोलन करणाऱ्या ‘सीजेपी’च्या वतीने संविधान चौकात आयोजित आंदोलनासाठी दीपके नागपुरात आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच आंदोलनस्थळी सभेला संबोधन केले. ‘केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थाबणार नाही. त्यामुळे येत्या २० जूनला दिल्लीत जास्तीत जास्त संख्येने युवा व विद्यार्थी वर्गाने सहभागी व्हावे.

    युवकांनी धर्मावरून सुरू असलेल्या राजकारणापासून दूर राहावे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपली लढाई सातत्याने सुरू असेल’, असे ते म्हणाले. ‘आकांक्षा चतुर्वेदीसाठी आवाज उठवल्यामुळे मला अराजकतावादी म्हटले जात असेल, तर मी अराजकतावादी आहे’, असे प्रत्युत्तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने दिले.

    Nitesh Karale : पोस्टर दाखवले, नाव घेऊन टीका केली; कराळे गुरुजींनी कॉकरोच पार्टीचं आंदोलन गाजवलं

    ‘नीट पेपरफुटी आणि पुनर्परीक्षेच्या तणावाखाली आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, तिच्या परिवारास एक कोटी रुपयांची मदत मिळावी’, अशी मागणी दीपके यांनी यावेळी केली. दुपारी आकांक्षाच्या घरी घरी जाऊन त्यांनी तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

    आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक युवक युवतींनी कॉकरोचचे मुखवटे घालून आणि विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी दीपके यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी तरुण तरुणींसह ज्येष्ठ नागरिक व पालक त्यांच्या पाल्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी असलेल्या व्यासपीठावर खंजेरी वादक सत्यपाल महाराज, निलेश कराळे यांच्यासह सीजेपीचे नागपूरचे सदस्य उपस्थित होते.

    Maharashtra Timesगोरेवाड्यात ‘बिबट वॉर’! दोन नर, एका मादीने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयातील धक्कादायक घटना
    घोषणाबाजी करत आंदोलनाला विरोध
    भगवे दुपट्टे परिधान केलेल्या काही कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत ‘सीजेपी’च्या आंदोलनाला विरोध केला. ‘सीजेपी’ युवकांची दिशाभूल करत असून, आंदोलनात काही शहरी नक्षलवादी सहभागी झाले असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलनकर्त्यांशी वाद घातला. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी घोषणाबाजी झाल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत विरोध करणाऱ्यांना बाहेर काढले.

    पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची ‘मन की बात’ ऐकावी
    ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज वेगवेगळ्या घडामोडींवर समाजमाध्यमांवर व्यक्त होतात. मात्र, नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आणि पेपर फुटल्यामुळे देशातील पाच निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, यावर ते बोलले नाहीत. त्यांनी देशातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधत त्यांची ‘मन की बात’ ऐकून घ्यावी’, असे दीपके म्हणाले.

    Maharashtra TimesNagpur Crime: नागपुरात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; VIDEO व्हायरल करायची धमकी देऊन 3 लाख उकळले, वर्गमित्रासह दोघांना अटक
    माझ्यावरील हल्ला संघाकडून
    आपल्या जयपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाने हल्ला केल्याचा आरोप दीपके यांनी नागपुरात केला. ‘हा हल्ला संघाने केला असून, कितीही हल्ले झाले तरी मी मागे हटणार नाही. माझ्यावरील झालेला हा हल्ला वाढत्या बेरोजगारीचे द्योतक आहे. थोडे पैसे देऊन त्यांना हा प्रकार करावा लागत आहे. नोकरी असती तर तरुणांनी कधीही असा प्रकार केला नसता’, असेही ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा