• Sat. Sep 5th, 2026
Pratap Sarnaik : कोल्हापूर एसटीच्या कॅन्टीनमधला दरफलक पाहून परिवहन मंत्री संतापले; मालकाला झापलं

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. या वेळेला मंत्र्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. ही पाहणी करत असताना अत्यल्प दरात प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या उपहारगृहात मंत्र्यांना मात्र भलताच प्रकार पाहायला मिळाला. याठिकाणी उपहारगृहात थेट किचनची पाहणी करून त्यांनी दरपत्रक पाहिले असता त्यांना धक्काच बसला. दरफलकावर दरांवर चिकटपट्टी लावली होती. तसेच 30 रुपयात भरपेट नाष्टा या योजनेचा फलक उपहारगृहात कुठेच नव्हता. यावरुन कॅन्टीन मालकाला मंत्री सरनाईक यांनी झापलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed