Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
पुणे सहकारनगर घरात महिलेसोबत जबरदस्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : दुपारची वेळ…घरात ३७ वर्षीय महिला एकटीच…आणि अचानक दरवाजा ढकलून एक २८ वर्षीय रिक्षाचालक दरवाजासमोर जातो. सुरुवातीलाच तो अश्लील भाषेत बोलायला लागतो. ‘तुझा नवरा बाहेर गेलाय…मी आत येतो, आपण मज्जा करू’, हे ऐकून महिला हादरते…पण पुढे जे घडलं, ते आणखी धक्कादायक आहे.
पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यातील सहकारनगर परिसरात ११ एप्रिल शनिवारी रोजी घडलेल्या या प्रकारानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमित संजय मोरे (वय २८, व्यवसाय रिक्षाचालक, रा. धनकवडी) असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, त्या दिवशी दुपारी त्या घरी एकट्याच असताना आरोपी थेट दाराजवळ आला. त्यावेळी त्याने अश्लील वाक्यं बोलत महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेने त्याला विरोध करत ‘असं काहीही बोलू नकोस, मी तुझ्या आईसारखी आहे’, असं ठणकावून सांगितलं. तरीही ‘मला आत येउ दे, आपण मज्जा करू, काहीही होणार नाही’, असं म्हणत आरोपीने महिलेला त्रास दिला. Yavatmal Crime : यवतमाळमध्ये डोकं चक्रावणारं प्रकरण, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, मुली बेपत्ता कशा झाल्या? वाचा A टू Z मात्र, त्यानंतर महिला नकार देत होती म्हणून आरोपी आणखी आक्रमक झाला. ‘मी आधी जेलमध्ये जाऊन आलो आहे. मला काही फरक पडत नाही. माझं कोणी वाकडं करू शकत नाही’, असं म्हणत त्याने महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर ‘तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, तुझ्या नवऱ्याला बघून घेईल,’ अशी थेट धमकीही दिली. या सगळ्या प्रकारामुळे महिला पूर्णपणे घाबरून गेली.
‘महिला घरातसुद्धा सुरक्षित नाही का?’
घटनेनंतर महिलेनं तात्काळ सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अद्याप आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘महिला घरातसुद्धा सुरक्षित नाही का?’ असा सवाल आता स्थानिक महिलांकडून विचारला जातोय. पोलिसांकडून आरोपीला लवकर अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून पुढील तपास सुरू आहे. Accident News : भावाच्या उत्तरकार्याला निघाले, वाटेतच मृत्यूने गाठले, पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा करुण अंत; १५ दिवसांनी लेकाचं लग्न महत्त्वाचं म्हणजे, अशा प्रकारच्या घटना समोर आल्यास घाबरून न जाता त्वरित पोलिसांत तक्रार द्यावी, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जाईल. मात्र, शहरातील वाढती गुन्हेगारी, अत्याचार करणाऱ्यांची हिम्मत आता प्रशासन यंत्रणेपुढे देखील कमी वाटायला लागली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा तरी धाक उरलाय का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतोय.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा