Akshaya Tritiya 2026: कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी असल्याने, काही व्यापारी नफा मिळवण्यासाठी केरळ, कर्नाटकचे आंबे कोकणातील हापूस म्हणून विकत असल्याचे चित्र आहे.
अक्षय तृतीयेला सोन्यासोबतच, आंबा खरेदीदेखील होते. त्यामुळे फळ बाजारात आंब्याची आवक वाढते. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून वाशीतील घाऊक फळ बाजारात कोकणातून हापूस आंब्याच्या दररोज सरासरी ५० हजार पेट्या येत आहेत, तर शनिवारी ६० हजार पेट्या आंबा आला. गेल्या वर्षी ही आवक ७० हजार पेट्यांची होती. ‘गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी आवक कमी असली तरी बाजारात या हंगामातील आंब्याची सर्वाधिक आवक अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला झाली आहे. आंब्याच्या पेटीची किंमत दीड हजारापासून सुरू आहे’, अशी माहिती फळ बाजाराच्या संचालक संजय पानसरे यांनी दिली.
Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात; मद्यधुंद डंपरचालकाने चार वाहनांना ठोकले, 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
कोकणाबरोबरच राज्यातील अन्य भागांतून आणि केरळ, कर्नाटकमधूनही वेगवेगळ्या जातींच्या आंब्याचे सरासरी ३५ हजार कॅरेट बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे बाजारात नेहमीच्या मानाने आंबे वाढलेले पाहायला मिळत आहेत. मात्र, एकूणच आढावा घेतला असता गेल्या वर्षीच्या मानाने आवक कमीच आहे. हवामान आणि खराब वातावरणामुळे कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन घटले आहे.
परिणामी, बाजारात सरासरी आंब्याची आवक कमीच आहे. आवक कमी असल्यामुळे भावही चढे आहेत. याचाच फायदा घेत बाजारातील काही व्यापारी कोकणातील हापूसच्या नावाने इतर जातींच्या आंब्याची हापूस म्हणून विक्री करताना दिसत आहेत. बाजाराबरोबरच बाहेर लागणाऱ्या आंब्यांच्या स्टॉलवरही रत्नागिरी, देवगड हापूस या नावाने आंब्याची विक्री केली जात आहे. मात्र, यातील बहुतांश आंबे केरळ, कर्नाटकमधीच आहेत.
पंचांग 19 April 2026: अक्षय्य तृतीया, श्रीपरशुराम जन्मोत्सव, आयुष्मान योग, त्रिपुष्कर योग, रवि योग! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
‘तक्रार आल्यास कारवाई’
‘बाजारात काही व्यापारी हापूस आंब्याच्या नावाने इतर आंब्याची विक्री करत असल्याचे सांगण्यात येते. याबाबत काही तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल’, असे वाशीतील घाऊक फळ बाजाराचे उपसचिव राजीव कोंडे यांनी नमूद केले
