• Wed. Jun 17th, 2026

    Chitra Wagh: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचा! आमदार चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

    Chitra Wagh: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचा! आमदार चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

    Chitra Wagh On Woman Safety: भोंदूबाबा अशोक खरातला ठेचण्याचे काम सुरू असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

    चित्रा वाघ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक/नाशिकरोड: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. एक-दोघांना ठेचले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चा अध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. अशा नराधमांच्या घरांवर बुलडोझर चालविण्याच्या मागणीचेही वाघ यांनी जोरदार समर्थन केले.

    नाशिकमधील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण आखण्याबाबत आयोजित उच्चस्तरीय बैठकीच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘पॉश ॲक्ट’मध्ये बदल होणे गरजेचे आहे. ज्या कंपनीच्या सहली जातात, तिथेही महिलांचा छळ केला जातो. व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमधून महिलांना छळाला सामोरे जावे लागते. दहापेक्षा जास्त महिला असतील, तिथे ‘पॉश ॲक्ट’ लागू होतो. हे एका विभागाचे काम नाही, यासाठी भरारी पथके निर्माण केली गेली पाहिजेत. ज्या गोष्टी कायद्यात सांगितल्या आहेत, त्याच्या तरतुदी झाल्या पाहिजे. ९० दिवसांच्या आत न्याय नाही मिळाला तर दंड झाला पाहिजे, अशीही एक तरतूद केली गेली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत. छळ प्रकरणातील बाधित महिला अनेकदा तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. मी त्याचा पाठपुरावा करणार आहे,’ असेही वाघ यांनी सांगितले.
    Maharashtra TimesNashik TCS Case : टीसीएस कंपनी ‘डेलॉईट-ट्रायलीगल’मार्फत नाशिक प्रकरणाची सखोल चौकशी करणार, निदा खानबद्दलही मोठा खुलासा; अधिकृत निवेदनात काय सांगितलं?
    ‘पोटनिवडणुकीनंतर निर्णय’
    ‘महिला आयोगाचे पद रिकामे असले तरी इतर अधिकारी काम करीत आहेत. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही भेटलो. बारामतीची पोटनिवडणूक झाल्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद भरले जाईल. कारण ते पद राष्ट्रवादीकडे होते,’ असे त्या म्हणाल्या.

    ‘महिलांचा हक्क हिरावला’
    संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याबद्दल चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. ‘२७ वर्षांच्या संघर्षानंतर महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार होते, मात्र काहींनी विरोध केल्याने महिलांचा हक्क हिरावला गेला,’ असे त्या म्हणाल्या.
    Maharashtra TimesWoman Died After Delivery: सिझरनंतर काही तासांतच मातेचा मृत्यू; नातेवाईकांचा हलगर्जीपणाचा आरोप, नाशकात महिनाभरात तीन घटना
    खरातच्या मागे तपास यंत्रणा
    ‘अशोक खरातसारख्या एखाद्याला पकडणे सोपे आहे. पण, त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड असते. खरातच्या मागे ‘ईडी’, ‘एसआयटी’, ‘सीबीआय’ सगळे लागलेले आहेत. रोज त्याची प्रकरणे बाहेर येत आहेत. खरातसारख्या प्रकरणांमध्ये महिलांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात. दोषींना आपण शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही,’ असे त्यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा