• Mon. Aug 3rd, 2026

    वारणा धरणात २९.७२ टी.एम.सी. पाणीसाठा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 3, 2026
    वारणा धरणात २९.७२ टी.एम.सी. पाणीसाठा – महासंवाद

    सांगली, दि. ३ ऑगस्ट : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.72 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी इतकी असल्याचे जपसंपदा विभागाने कळविले आहे.

    विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 91.43 (105.25), धोम 11.98 (13.50), कन्हेर 9.60 (10.10), धोमबलकवडी 3.56 (4.08), उरमोडी 9.15 (9.97), तारळी 5.27 (5.85), वारणा 29.72 (34.40), राधानगरी 8.33 (8.36), दूधगंगा 18.45 (25.40), तुळशी 3.12 (3.47), कासारी 2.35 (2.77), पाटगांव 2.83 (3.72), अलमट्टी 111.97 (123). सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 30223, धोम 5350, कण्हेर 2335, धोम बलकवडी 1329, उरमोडी 1799, तारळी 2182, वारणा 6900, राधानगरी 4256, कासारी 950 व अलमट्टी धरणातून 1 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 28.6 (40) व अंकली पूल हरिपूर 32.9 (45.11).

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed