Bhandara Ordnance Factory Accident: आयुध निर्माणी भंडारा येथे शनिवारी, एका कामादरम्यान अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास निर्माणीच्या ॲसिड विभागामध्ये टँक बदलण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तिथे कार्यरत असलेल्या चार जणांना किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर तातडीने बचाव कार्य राबवून चौघांनाही निर्माणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर, अधिक चांगल्या आणि तज्ज्ञ उपचारांसाठी त्यांना शहरातील मोठ्या विशेष रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जखमींची प्रकृती सध्या ठीक असून काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही.
Yavatmal Crime : मटणाची भाजी अर्धवट शिजली, पती नको ते बोलला, अपमान सहन न झाल्यानं पत्नीचं टोकाचं पाऊल; हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी
परिसरात चर्चेला उधाण
आयुध निर्माणी हा अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक नियम असलेला विभाग असल्याने या अपघाताची वार्ता समजताच परिसरात चर्चेला उधाण आले होते. मात्र, प्रशासनाने तातडीने अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून सर्व जखमी सुरक्षित असल्याचे सांगत अफवांवर पडदा टाकला आहे. ही माहिती अपर महाप्रबंधक तथा जनसंपर्क अधिकारी, आयुध निर्माणी भंडारा यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
Solapur Crime : ‘तू वारंवार किरकिर करते’; संतापलेल्या नातीकडून आजीला बेदम मारहाण; विठ्ठलाच्या पंढरीत विठुरायाच्या भक्ताला संपवलं
प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश
या घटनेची गांभीर्याने दखल घेत आयुध निर्माणीच्या व्यवस्थापनाने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. टँक बदलताना नेमकी चूक कुठे झाली आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल तपासणी केली जात आहे.
