• Tue. Sep 8th, 2026
देशातील कोणत्याही भागात कार चालवा बिनदिक्कत, BH नंबरप्लेटला पुण्यात उदंड प्रतिसाद, रचना अत्यंत वेगळी

Pune Bharat series BH number plate : भारत सीरीजवर देशातील कोणत्याही राज्यात किंवा राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बिनदिक्कतपणे प्रवास करता येऊ शकतो. त्यामुळे ‘बीएच सीरीज’ला प्रतिसाद वाढताना दिसत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘वन नेशन वन नंबर’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या भारत क्रमांक (बीएच) सीरीजला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) २०२५-२६ या आर्थिक वर्षात सात हजार ३९४ वाहनांची ‘बीएच सीरीज’अंतर्गत नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते.

बीएच सीरीजची खासियत

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांची नोंदणी हस्तांतरित (व्हेइकल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर) करण्याचे टाळण्यासाठी सन २०२१ मध्ये रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने ‘बीएच सीरीज’ सुरू केली होती. एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवता येऊ शकते. त्यानंतर वाहन त्याच राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यात ते वाहन नोंदणी करणे आवश्यक असते.
Maharashtra TimesNashik Crime : प्रत्येक सेकंदाला कॉल यायचा, TCS नाशिकमधील विवाहितेबाबत जाणीवपूर्वक सेटिंग, ‘सीक्रेट’साठी दबाव

‘बीएच सीरीज’ला वाढता प्रतिसाद

‘मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७’अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते; परंतु वाहन मालकाकडे ‘बीएच नंबर सीरीज’ असेल, तर त्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही परवानगी घ्यायची गरज लागत नाही. तो या सीरीजवर देशातील कोणत्याही राज्यात किंवा राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बिनदिक्कतपणे प्रवास करू शकतो. त्यामुळे ‘बीएच सीरीज’ला प्रतिसाद वाढत आहे.

मुलगी पळवली, ७ दिवस जेलवारी, आजही तीच टीका; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला खरा किस्सा

गेल्या आर्थिक वर्षात ७३९४ नोंदण्या

पुण्यात अनेक केंद्रीय सरकारी, निमसरकारी कार्यालय आहेत; तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘बीएच सीरीज’ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात सात हजार ३९४ जणांनी ‘बीएच सीरीज’ घेतली आहे. यामध्ये चार हजार ६३७ जणांनी कारसाठी ‘बीएच सीरीज’ घेतली आहे, तर दुचाकीसाठी २, ७५७ जणांनी सीरीज घेतली आहे.
Maharashtra TimesPune Crime : पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, पुण्यात दाम्पत्यासह 13 वर्षांची मुलगीही ताब्यात

नंबर प्लेटची रचना

‘बीएच सीरीज’च्या वाहनांच्या नंबरप्लेट या वर्षानुसार ओळखल्या जातात. ज्या वर्षी ‘बीएच सीरीज’चा क्रमांक घेतला आहे. त्यानुसार वर्षाचे शेवटे दोन क्रमांक, ‘बीएच’ आणि नंतर वाहनाचा क्रमांक व शेवटी ‘ए’ ते ‘झेड’ दरम्यानचे एक अक्षर असेल. सुलभ प्रक्रिया आणि देशभर निर्बंधमुक्त वाहन वापराची सुविधा यामुळे पुण्यात ‘बीएच सीरीज’ची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा