Kolhapur Jawan Martyr in Jammu Kashmir : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 2020 मध्ये भरती झालेल्या रोहित खन्नीकुडे यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावाचे सुपुत्र असलेले २७ वर्षीय जवान रोहित परशुराम खन्नीकुडे हे जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना 16 एप्रिल रात्री 12 वाजता एका अपघातात शहीद झाले आहेत. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 2020 मध्ये भरती झालेल्या रोहित यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. रोहित यांचे पार्थिव रविवारी सकाळी टाकळीवाडीला दाखल होईल. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना अपघात
टाकळीवाडीतील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण श्री कुमार विद्यामंदिर टाकळीवाडी येथे झाले. आठवी ते दहावीचे शिक्षण श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे, तर पदवीपूर्व श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे त्यांनी पूर्ण केले. पुढे सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीत भरती होऊन तिथेच प्रशिक्षण घेतले. सैन्यात भरती झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश त्यानंतर चीन सीमेवरही ते कर्तव्यावर होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचा एक अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. Nashik Crime : प्रत्येक सेकंदाला कॉल यायचा, TCS नाशिकमधील विवाहितेबाबत जाणीवपूर्वक सेटिंग, ‘सीक्रेट’साठी दबाव
कुटुंब आणि गावावर दुःखाचा डोंगर
रोहित यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. वडील परशुराम शेतकरी आहेत, तर आई गृहिणी आहेत. मुलगा गेला असला तरी देशासाठी प्राणार्पण केल्याने अभिमान वाटत असल्याच्या कुटुंबीयांच्या भावना आहेत. ग्रामस्थांनी खन्नीकुडे कुटुंबाच्या घरी भेटी देत सान्त्वन केले आहे.
Hasan Mushrif गोकूळच्या भ्रष्टाचाराचा पैशाचा वापर भाजपविरोधात करतायत, भाजप आमदाराचा आरोप
Pune Crime : पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, पुण्यात दाम्पत्यासह 13 वर्षांची मुलगीही ताब्यात
गावकऱ्यांचा श्रद्धांजली सन्मान
रोहित खन्नीकुडे यांच्या निधनाची माहिती मिळताच टाकळीवाडी गाव शोकमग्न झाले असून, जम्मू-काश्मीरमधून त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी येण्यासाठी निघाले असून रविवारी ते गावी दाखल होणार आहे. यावेळी शासकीय मानवंदना देण्यात येणार असून मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिक अधिकारीही रविवारी गावी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. रोहित यांच्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या भूमीने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झाले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा