• Wed. Sep 9th, 2026

Radha Patil : दहीहंडीचा कार्यक्रम राधा पाटीलच्या अंगाशी, नृत्यांगनेवर गुन्हा दाखल; काय घडलं?

पुण्यात डान्सर राधा पाटील हिच्यासह दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक आणि मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : डान्सर राधा पाटील मुंबईकर हिच्यावर पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधा पाटील हिच्यासह दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करणारे मंडळाचे अध्यक्ष भुषण सोनवणे आणि आयोजक अमोल कांटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लावणीच्या नावाने अश्लील डान्स सादर होऊ नये म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्र दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी सादर करण्याची अट होती. तसं प्रमाणपत्र सादर न झाल्यास संबंधित मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नव्हती. संबंधित अट मान्य न केल्याने आता पुण्यात दहीहंडी आयोजकांसह मंडळाचे अध्यक्ष आणि डान्सर राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवर पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

राज्यभरात नुकताच गोकुळाष्टमी आणि गोपाळकालाचा उत्साह बघायला मिळाला. या सणाच्या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमांना चांगलीच रंगत आलेली बघायला मिळाली. या कार्यक्रमांमध्ये टीव्ही मालिका, सिनेमांमध्ये दिसणारे कलाकार मंडळी मंचावर बघायला मिळाले. अनेक अभिनेत्री, डान्सर या कार्यक्रमांच्या मंचावरुन दहीहंडी फोडणारे गोविंदा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले. यामध्ये प्रसिद्ध रिल्सस्टारदेखील सहभागी होते. पण या कार्यक्रमांवरुन नेटीझन्सकडून टीकेची झोडदेखील उठताना दिसत आहेत.

एकीकडे सण, उत्सव साजरी होत असताना लावणीच्या नावाने आक्षेपार्ह डान्स स्टेप्सवर अनेकांचा आक्षेप आहे. हे असे प्रकार याच उत्सवात झाले आहेत, असं नाही. तर याआधीदेखील सर्रासपणे अश्लील नृत्य झाल्याचे काही ठिकाणी बघायला मिळाले आहे. अशाप्रकारचे डान्स मोठ्या मंचावरुन होऊ नये, यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या. कारण अशा डान्स स्टेप्सवरुन लहान मुलांवर काय संस्कार होतील? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच समाज म्हणून आपली वाटचाल कोणत्या दिशेला यामुळे होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्राची अट ठेवण्यात आली होती. पण ही अट पाळली न गेल्यामुळे पुण्यात राधा पाटील हिच्यासह मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra TimesMaharashtra Rain : श्रींच्या आगमनाला तुफान पाऊस येणार, 13 ते 17 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?

“चालु वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडी उत्सव सन 2026 चे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील उत्सव साजरा करणारे मंडळे स्पिकर, मिरवणुक परवाना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने परवानगी मिळणेकामी अर्ज सादर केले होते. त्याप्रमाणे कात्रजला राहणारे एम्पायर ग्रुप ए. के. बॉइजचे अध्यक्ष भुषण सोनवणे यांनी 06/09/2026 रोजी दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने लावणी नृत्यांगणा/कलाकार राधा पाटील यांचे लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता.”

Maharashtra TimesCrime News : दरोडेखोरांनी स्वप्नातही विचार केला नसेल तशा मुसक्या आवळल्या, समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्यांना सिनेस्टाईल बेड्या“त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधीत विषयाबाबत मुंबईतील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सचिव यांचे रंगभूमी मंडळांची कार्यपद्धती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्वे निश्चिती बाबत आणि त्याप्रमाणे मंडळाचे कार्य चालतेबाबत अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर यांचे जा.क्र.अपोआ/प्रशासन/मनोरंजन कार्यक्रम/परवाना/2026 /96 दि. 02/09/2026 अन्वये मा. सचिव, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई यांचे जा.क्र.रंप्रपम/आस्था/2591/2026 दि. 14/08/2026 पत्रातील सुचनांचे पालन करनेबाबत पत्र प्राप्त आहे.”

“सदर पत्रान्वये अर्जदार भुषण सोनवणे यांना सदर लावणी कार्यक्रमाचे अनुषंगाने विहीत नमुन्यामध्ये परवानगीसाठीची कागदपत्रे सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. पण मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा/कलाकार राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे/प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पो.स्टे. जा.क्र./4427/2026 दि. 06/09/2026 अन्वये सदर कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली होती.”

Maharashtra TimesSatara News : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, आरोपीचा पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर घातपात“तरी भैरवनाथ सोसायटी आंबामाता मंदिर रोड सुखसागरनगर कात्रज पुणे या ठिकाणी यातील अर्जदार आरोपी भुषण सोनवणे, आयोजक अमोल कांटे, राधा पाटील मुंबईकर लावणी कलाकार यांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई कार्यालयाकडील कोणतेही प्राधिकृत कागदपत्रे/प्रमाणपत्र सादर केली नाहीत. तसेच सदर कार्यक्रमास परवानगी नाकारली असताना कार्यक्रम आयोजित करुन दिलेल्या आदेशाचा भंग करुन लावणी कार्यक्रम आयोजित केला. यामुळे दिलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”