• Sun. Jun 7th, 2026
    राज्याच्या सहकार मंत्रालयावर भाजपचा डोळा? चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याची चर्चा

    Chandrakant Patil Pravin Darekar: सहकार विद्यापीठ, विद्यापीठांत स्वतंत्र सहकार विभाग, सहकार महाविद्यालय अशी कोणती तरी रचना पुढील तीन महिन्यांत मार्गी लावू, अशी ग्वाही पाटील यांनी या वेळी दिली.

    भाजप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी माझ्याकडे काही योजना आहेत, त्या सरकार दरबारी मांडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सहकार क्षेत्राचे पालकत्व घ्यावे,’ असे आवाहन आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. त्यानंतर लगेचच दरेकर यांच्या पदनामात ‘कॅबिनेट मंत्री दर्जा’ असा शब्द आहे, तो लवकरच निघून जावा. तो गेल्यावर त्यांच्याकडे कदाचित सहकार खातेच येईल; तसे झाल्यास माझ्याकडे येण्याची गरज नाही, दरेकर स्वत:च निर्णय घेऊ शकतील, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले आणि सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा सुरू झाली.

    निमित्त होते, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे येथील संचालक मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना दरेकर आणि पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

    Maharashtra TimesSushma Andhare : ठाकरे विधान परिषदेवर न गेल्यास सुषमा अंधारेंना तिकीट, राजकीय वर्तुळात चर्चा; काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
    राज्यात सहकाराची अवस्था पाहता त्याला ऊर्जितावस्था देणे आवश्यक आहे. राज्यातील अडीच लाख सहकारी संस्थांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सहकारी संघाकडे आहे. त्याकरिता संघ मजबूत होणे आवश्यक आहे. असे सांगून दरेकर यांनी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या. पाटील हे संसदीय कामकाज मंत्री असल्याने मुद्दाम त्यांना या कार्यक्रमाला बोलविले आहे. चंद्रकांतदादांनी राज्यातील सहकार क्षेत्राचे पालकत्व घ्यावे, असे आवाहन दरेकर यांनी केले.

    त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘दरेकर राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरण आणि मुंबै जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांना कॅबिनेटमंत्र्याचा दर्जा आहे. त्यांच्या पदनामातील ‘दर्जा’ हा शब्द निघून गेल्यास त्यांच्याकडे सहकार खातेच येईल आणि तसे झाल्यास माझ्याकडे येण्याची गरज नाही. दरेकर स्वत:च सहकार क्षेत्राबद्दल निर्णय घेऊ शकतील.’
    Maharashtra TimesMaharashtra Heat Stroke: सावधान! राज्यात दीड महिन्यात उष्माघाताचे 17 रुग्ण; पारा आणखी वाढण्याची शक्यता
    ‘पुणे विद्यापीठात स्वतंत्र सहकार विभाग’
    केंद्राने यापूर्वीच गुजरातमध्ये सहकार विद्यापीठ सुरू केले आहे; तसेच पुण्यात वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेसारखी (वैमनिकॉम) ही सहकारातील नामांकित प्रशिक्षण संस्था असताना पुन्हा वेगळे विद्यापीठ काढता येईल किंवा कसे, याचा अभ्यास केला जाईल. राज्यातील ८४ विद्यापीठांत सहकार हा विभाग स्थापन करायचा आणि संबंधित विद्यापीठाने सहा-तीन महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करायचा, हा पर्यायदेखील आहे. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहकार विभाग स्थापन करू आणि त्यासाठीचे मनुष्यबळ राज्य सरकार मंजूर करील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा