• Sat. Jun 6th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar Crime : तृतीयपंथीयासोबत पैशांवरुन वाद, साथीदारांनी टाळी वाजवली अन् घात झाला; छ.संभाजीनगरमधील वकिलाच्या हत्येचं गूढ उलगडलं

    Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    गांधेली फाटा वकील मिथुन भास्कर हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील गांधेली फाटा परिसरात बुधवारी १५ एप्रिल रोजी रात्री रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या मिथुन भास्कर या वकिलाच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. ही आत्महत्या किंवा अपघात नसून पैशांच्या वादातून हत्या झाली असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका तृतीयपंथीयासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सादीक बशीर अन्सारी (वय ४०), नानासिंग जुली (वय २०) आणि एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश आहे.

    नेमकी घटना काय?

    पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत वकील मिथुन भास्कर हे बुधवारी १५ एप्रिल रोजी सायंकाळी गांधेली फाटा परिसरात सादीक नावाच्या तृतीयपंथीयाला भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद वाढत गेल्यानं संतापलेल्या सादीकने आपल्या साडीत लपवून ठेवलेला चाकू काढला आणि थेट भास्कर यांच्या मांडीवर वार केला.
    Maharashtra TimesSangli Crime: बायकोसाठी आईचा जीव घेतला; तोंड दाबून लेकानेच माऊलीला संपवलं; सांगलीतील घटनेनं सगळेच सुन्न

    झुडपातील टाळी अन् थरार

    या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टोळीची कार्यपद्धती गांधेली फाटा परिसरात रात्रीच्या वेळी ही टोळी सक्रिय असते. सावज जाळ्यात अडकलं की, झुडपातून टाळी वाजवून साथीदारांना सिग्नल दिला जातो. भास्कर यांच्याशी वाद सुरू असतानाच सादीकने टाळी वाजवली आणि त्याचे दोन साथीदार मदतीला आले. जखमी भास्कर यांनी ओरडू नये म्हणून या तिघांनी त्यांना तिथेच दाबून धरले. मांडीतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भास्कर बेशुद्ध पडले. ते मृत झाल्याचं समजताच आरोपींनी त्यांना रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला. हत्या केल्यानंतर घाबरलेला सादीक शिवाजीनगर भागात आपल्या गुरूकडे जाऊन लपला होता. मात्र, पोलिसांनी रात्रीच बायपासवरील तृतीयपंथीयांचे नेटवर्क खंगाळले आणि सादीकचा माग काढला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर दोन साथीदारांची नावंही सांगितली. सहाय्यक निरीक्षक भारत पाचोळे आणि त्यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना जेरबंद केलं आहे.
    Maharashtra TimesHarbour AC Local : प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार; हार्बर रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक AC Local, १४ फेऱ्या वाढणार

    ‘बीड बायपासवर रात्रीस खेळ चाले’

    झाल्टा फाटा ते गांधेली फाटा या मार्गावर तृतीयपंथीयांची मोठी टोळी सक्रिय आहे. बाहेरून येणारे ट्रक चालक किंवा बाजारपेठेतून परतणाऱ्या व्यापाऱ्यांना हे लोक टार्गेट करतात. झुडपात नेऊन लुटणं आणि विरोध केल्यास हल्ला करणं असा यांचा शिरस्ता आहे. अब्रू जाण्याच्या भीतीनं अनेक जण तक्रार करत नाहीत, याच गोष्टीचा फायदा घेत या टोळीची हिंमत वाढल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा