Amravati Girls Assault Case : मुलींशी ऑनलाइन संपर्क साधल्यानंतर अयान चार ते पाच महिन्यांत त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की, तो लैंगिक संबंधांची मागणी करायचा किंवा शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती करायचा.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : अमरावती येथील लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याने ‘आपल्या पहिल्या प्रेमभंगानंतर आपण “प्लेबॉय बनलो” असं तपास अधिकाऱ्यांना अत्यंत सहजपणे सांगितल्याचं म्हटलं जात आहे. त्याची कबुली नोंदवून घेणारे वरिष्ठ तपास अधिकारी, गुन्ह्यांची कबुली देताना त्याने दाखवलेल्या या बेफिकिरीमुळे थक्क झाले होते. अयान मुलींशी ऑनलाइन संपर्क साधल्यानंतर चार ते पाच महिन्यांत त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की, तो लैंगिक संबंधांची मागणी करायचा किंवा शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती करायचा.
किशोर वयातील मानसिकता
चौकशीदरम्यान अयानचे विचित्र शांतभाव आणि त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा पूर्ण अभाव पाहून पोलीस अधिकारीही चक्रावले. अयान मानसिकदृष्ट्या स्थिर असून त्याच्यामध्ये कोणतेही दृश्य स्वरुपाचा मानसिक विकार किंवा असंतुलन दिसून आलं नाही, अशी नोंदही तपास अधिकाऱ्यांनी केली. “हे प्रकरण एखाद्या मानसिक आरोग्याच्या समस्येपेक्षा, विशिष्ट प्रकारची किशोरवयीन मानसिकता आणि जीवनशैलीची निवड याच्याशी अधिक संबंधित असल्याचं दिसून येतं” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं.
व्यावसायिक भरभराट तरी उधार उसनवारी
अयानचा मोबाईल फोनचा व्यवसाय भरभराटीस आला होता. इन्स्टाग्रामवरील ‘पेड प्रमोशन्स’च्या माध्यमातून तो बऱ्यापैकी पैसाही कमवत असे; इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे १८,००० फॉलोअर्स होते, असं तपासातून निष्पन्न झालं. असं असूनही अयान आपल्या मित्र परिवाराकडून आणि नातेवाईकांकडून पैसे उसने घेत असे. या पैशांचा वापर तो आपली “स्वैराचारी लाईफस्टाईल” जपण्यासाठी करत असे. तो मुलींवर उधळपट्टी करत असे आणि आपली सोशल इमेज अत्यंत ऐषारामी असल्याचे भासवत असे.
सोशल मीडिया इमेजमुळे फायदा
पोलिसांनी सांगितलं की, महिलांवर भुरळ पाडण्यात त्याच्या सोशल मीडियावरील प्रतिमेने महत्त्वाची भूमिका बजावली. अयान मुलींशी ऑनलाइन संपर्क साधायचा आणि चार ते पाच महिन्यांत हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की, तो लैंगिक संबंधांची मागणी करायचा किंवा शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्यांना जबरदस्ती करायचा.
बडतर्फ होण्यापूर्वी अयान एमआयएमच्या अमरावती शाखेच्या सोशल मीडिया हँडलचे सुपरव्हिजन करत होता. पोलीस त्याच्या डिजिटल कृत्यांचा तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा