• Sat. Jun 6th, 2026
    Amravati Crime : अमरावतीतील परतवाडा आक्षेपार्ह व्हिडिओ फाइल्स प्रकरण; आरोपींची संख्या वाढली, फॉरवर्ड करणाऱ्यांचा शोध सुरु

    Amravati Girls Assault Case : अमरावतीतील परतवाडा येथील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांचा देखील शोध सुरु आहे.

    अमरावती देहव्यापार ब्लॅकमेल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा : परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांच्या आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी आता आक्रमक पाऊले उचलली आहेत. गेल्या २४ तासांत पोलिसांनी आणखी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. मात्र, इतकी गंभीर घटना उघडकीस येऊनही सामाजिक भीतीपोटी अजून एकही पीडित युवती किंवा त्यांचे पालक तक्रारीसाठी समोर आलेले नाहीत. ही बाब तपासातील सर्वांत मोठे आव्हान ठरत असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

    सदनिकेचा रितसर पंचनामा

    या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार १९ वर्षीय अयान अहमद याला पोलिसांनी सर्वप्रथम बेड्या ठोकल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत गेली. अयानने चौकशीदरम्यान दिलेल्या कबुलीत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्याने पीडित मुलींचे शोषण करण्यासाठी आपल्या मित्राच्या सदनिकेचा वापर केल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमरावती शहरातील कठोरा मार्गावरील एका सदनिकेवर छापा टाकला. ही सदनिका अयानला उपलब्ध करून देणारा त्याचा मित्र मानव दीपक सुगंधे (२०) रा. आर्वी (हल्ली मुक्काम अमरावती) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या सदनिकेचा रितसर पंचनामा केला असून तिथून काही महत्त्वाचे पुरावेही संकलित केले आहेत.Maharashtra TimesAmravati Crime : पहिल्या ब्रेकअपमुळे प्लेबॉय बनलो; 180 मुलींचं शोषण करणाऱ्या अयानची निर्लज्ज कबुली, स्टोरी ऐकून पोलीस चक्रावले

    जप्त साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविणार

    केवळ शोषण करूनच हे आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनीपीडितांच्या अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केले होते. या ‘व्हायरल गँग’चा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेतली. यामध्ये चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी एैफाज खान मंजूर खान (२६), मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद (२१) आणि शेख नावेद शेख हसन (२१) तिघेही रा. अचलपूर यांना अटक केली आहे. यापैकी ऐफाज खान हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे मानले जात आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी लॅपटॉप, टॅब आणि हार्डडिस्क जप्त केली आहे. हे सर्व साहित्य आता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, त्यातून आणखी किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, हे स्पष्ट होणार आहे.

    Maharashtra TimesAmravati Crime : कोण जास्त मुली पटवणार, अयान-उझरमध्ये पैज, पण पैशातून वाद; रागात मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड अन् अमरावती प्रकरणावरील पडदा दूर

    ‘फॉरवर्ड’ करणाऱ्यांचा शोध सुरु

    गुन्ह्याचे गांभीर्य आणि यामागे एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी या तपासासाठी विशेष तपास पथक तैनात केले आहे. सहायक पोलिस अधीक्षक शुभमकुमार यांच्या नेतृत्वाखालील हे पथक आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ज्यांच्या मोबाईलवर या चित्रफिती आल्या होत्या आणि ज्यांनी त्या पुढे फॉरवर्ड केल्या, अशांचा शोध घेत आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या अजून वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप तक्रारदार समोर आले नसले तरी, पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा