Nashik Crime : वैद्यकीय उपचार घेऊनही जर तुला मूल होत नसेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठवून दे, अशी घाणेरडी सूचना आरोपीने केल्याचा जबाब टीसीएसमधील पुरुष कर्मचाऱ्याने दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : टीसीएसच्या नाशिकमधील शाखेत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतर झाल्याच्या प्रकारात नवनवीन खुलासे होत आहेत. आपल्याला गोल टोपी घालून नमाज अदा करण्यास सांगितल्याचा आरोप एका पुरुष कर्मचाऱ्याने केला आहे. इतकंच नाही, तर मूल होत नसल्यास तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव, असंही एक आरोपी म्हणाल्याचा दावा त्याने केला आहे.
संबंधित पुरुष कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, टीम लीडर्सनी त्याला नमाज पढण्यास, ‘कलमा’चे पठण करण्यास आणि डोक्यावर गोल टोपी घालण्यास भाग पाडलं. आरोपींपैकी एकाने त्याच्या खाजगी आयुष्याची खिल्ली उडवली. वैद्यकीय उपचार घेऊनही जर त्याला मूल होत नसेल, तर त्याने “आपल्या पत्नीला पाठवून द्यावे” अशी कुत्सित सूचना त्याने केली.
कंपनीत जॉईन होताच छळ सुरु
२०२२ मध्ये नाशिकच्या टीसीएस कंपनीत रुजू झाल्यानंतर काही कालावधीतच हा छळ सुरू झाला. त्याचा टीम लीडर तौसीफ अख्तर आणि सहकारी दानिश शेख यांनी मिळून त्याला टार्गेट करण्यास सुरुवात केली. अधिकारी पदावर असल्याचा गैरफायदा घेत, तौसीफने पीडित पुरुषाला आपल्या सर्व सूचनांचे पालन करण्यास भाग पाडलं. तसंच तो कायम दमून जावा, या उद्देशाने, इतरांच्या वाट्याचं कामही त्याच्यावर लादून कामाचा अतिरिक्त बोजा टाकला.
मूल हवं तर बायकोला पाठव
तक्रारदार पुरुषाने असाही दावा केला की, आरोपींनी त्याच्या खाजगी आयुष्यावर टिप्पणी केली. लग्नाला अनेक वर्षे उलटूनही मूलबाळ नसल्याच्या गोष्टीवरुन त्यांनी त्याची खिल्ली उडवली. जर त्याला मूल हवे असेल, तर त्याने आपल्या पत्नीला त्यांच्याकडे पाठवावे, अशा आशयाची अत्यंत आक्षेपार्ह शेरेबाजी त्यांनी केली. Amravati Crime : कोण जास्त मुली पटवणार, अयान-उझरमध्ये पैज, पण पैशातून वाद; रागात मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड अन् अमरावती प्रकरणावरील पडदा दूर
टेबल फॅन भिरकावला
पीडित व्यक्तीने या गोष्टीली विरोध केला तेव्हा परिस्थिती अधिकच चिघळली, त्यामुळे कामाच्या ठिकाणीच त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. तौसीफने त्याच्या दिशेने एक टेबल फॅन भिरकावला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
Ashok Kharat CDR : अशोक खरात प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत, नावासह कोणाचे किती कॉल?
चुंबन आणि लग्नाची मागणी
नाशिकच्या टीसीएसमधील २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या एका एफआयआरमध्ये दानिश आणि तौसीफ या दोघांची नावं सर्वप्रथम समोर आली. या एफआयआरमध्ये संबंधित तरुणीने असा आरोप केला होता की, दानिशने तिचे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. Two brothers One wife : दोन सख्ख्या भावांशी लग्न करणारी महिला आई झाली, चिमुकली पावलं घरी येताच परदेशी राहणाऱ्या पित्याची प्रतिक्रिया समोर
महिला पोलिसांमुळे पर्दाफाश
तसेच, दानिशचे साथीदार—तौसीफ आणि एचआर एक्झिक्युटिव्ह निदा खान यांनी देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने केली आणि तिच्या धार्मिक श्रद्धांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही तिने केला होता. यानंतर दाखल झालेल्या अनेक एफआयआरपैकी पहिल्या एफआयआरच्या आधारे, या घटनेचा तपास करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘अंडरकव्हर एजंट’ म्हणून पाठवण्यात आले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा