Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे झालेल्या एका अपघातात शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
सातपूर अपघात विद्यार्थ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये एका खासगी बसच्या धडकेत झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चेतन युवराज गांगुर्डे (वय १५) असं या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेनं शहर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
खासगी बसची जोरदार धडक
चेतन गांगुर्डे हा सातपूरच्या प्रबुद्ध नगर येथे राहत होता. सातपूर कॉलनी येथील मनपाच्या माध्यमिक विद्यालयात तो इयत्ता ९वीमध्ये शिक्षण घेत होता. तो दररोज परिस्थिती हलाकीची असल्यानं पायी शाळेत जात होता. नेहमीप्रमाणे काल बुधवार रोजी सकाळी चेतन हा शाळेसाठी निघाला होता. रस्त्यात त्याला एका दुचाकीस्वारानं लिफ्ट दिली आणि तो या दुचाकीस्वारासोबत बसून शाळेकडे निघाला. रस्त्यात जात असताना एका खासगी बसने दुचाकीला धडक दिल्यानं या अपघातात चेतन हा बसच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.Nashik TCS : नाशिक बळजबरी धर्मांतर प्रकरणामधील फरार ‘मास्टरमाईंड’ निदा खानचा पगार किती, बँक खात्यात कुठून आले पैसे? एसआयटीकडून तपास सुरु
या अपघातात दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेतन याचा अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण प्रबुद्ध नगर आणि त्याच्या शाळेत हळहळ व्यक्त केली जात आहे. चेतन याच्या पश्चात अंध वडील, आई, धाकटा भाऊ आणि वृद्ध आजी असा परिवार आहे. शाळेनंतर मिळालेल्या वेळात चेतन हा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम करत होता. चेतन याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
CBSE 10th Results : CBSE दहावीच्या निकालात पुण्याचा जलवा! देशात सातव्या स्थानी; मुर्तजा, निहार अन् ऋषभनं 99 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले
नशेचे इगतपुरी ‘कनेक्शन’ पुन्हा उघड
पंचवटी परिसरातील नीलगिरीबाग येथे नाशिक शहर अमली पदार्थविरोधी पथकाने (एनडीपीएस) रात्री सापळा रचून केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून दीड ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) जप्त करण्यात आले. ऋषिकेश गणेश परसे उर्फ ऋषीबाबा (वय २३, रा. पेठरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याने इगतपुरी येथून हा पदार्थ आणल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा नशेचे इगतपुरी कनेक्शन समोर आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा