• Sat. Jun 6th, 2026

    Maharashtra Weather: महामुंबईत रोजचे तापमान चाळीशी पार, ‘आयएमडी’च्या अहवालामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं; मान्सूनचा पहिला अंदाज समोर

    Maharashtra Weather: महामुंबईत रोजचे तापमान चाळीशी पार, ‘आयएमडी’च्या अहवालामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं; मान्सूनचा पहिला अंदाज समोर

    Weather Report 14 April: मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात रोजचे तापमान चाळीशी पार पोहोचले आहे. उन्हाचा कडाका वाढत असतानाच आयएमडीने सध्या त्यांचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याच्या शक्यतेने नागरिकांची चिंता वाढली आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे/ठाणे: कोकण आणि महामुंबई परिसरातील बहुतेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट असून अनेक भागात रविवारी चाळीशीपार तापमानाची नोंद झाली. साधारणतः आणखी आठवडाभर अधिक तापमान जाणवेल, असा अंदाज हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला आहे. समुद्रकिनारपट्टीलगत असणाऱ्या भागात मात्र तुलनेने कमी तापमान असताना आता मान्सूनच्या नव्या अंदाजामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

    ‘एल निनो’मुळे पावसावर परिणाम

    प्रशांत महासागरात मान्सून काळात एल निनो विकसित होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. ‘आयएमडी’च्या वतीने यंदाच्या मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर झाला. या अंदाजानुसार यंदा देशात सरासरीच्या 92 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. तीव्र उन्हाळ्यापाठोपाठ अपुऱ्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांसोबत प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.Maharashtra TimesKalyan-Ahilyanagar Highway Accident: पुलाचं काम अर्धवट तरी वाहतूक सुरू, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघातात 11 जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

    पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित हायब्रीड स्वरूपातील पत्रकार परिषदेत केंद्रीय पृथ्वी विज्ञान सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आगामी मान्सून काळातील पर्जन्यमान आणि ‘एल निनो’च्या प्रभावाविषयी माहिती दिली. सांख्यिकी आणि डायनॅमिक अशा दोन्ही स्वरूपाच्या मॉडेलमधून यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी, म्हणजे सरासरीच्या 90 ते 95 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मान्सून हंगामातील देशभरातील पावसाची सरासरी 870 मिलिमीटर आहे. येत्या हंगामात सरासरीपेक्षा कमी किंवा अपुऱ्या पावसाची शक्यता 66टक्के असून, सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता 34 टक्के आहे.

    मान्सून अंदाजाबाबत डॉ. महापात्रा म्हणाले, ‘युरोप आणि आशियात डिसेंबर ते मार्च या काळात सरासरीपेक्षा थोडी कमी हिमवृष्टी नोंदली गेली आहे. या हिमवृष्टीचा आणि मान्सून काळातील पर्जन्यमानाचा व्यस्त परस्परसंबंध आहे.’

    विदर्भ वगळून पाऊस कमी

    या वर्षी ईशान्येकडील राज्यांचा काही भाग, लडाख, तेलंगण आणि आंध्र प्रदेशचा काही भाग वगळता महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची अधिक आहे. राज्यस्तरीय अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तालुके वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे ‘आयएमडी’च्या अंदाजात म्हटले आहे.

    Maharashtra TimesMumbai Crime : गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचा ओव्हरडोस, मुंबईतील दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जणांना अटक

    मंगळवारी कसं असेल तापमान?

    ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. पलावामध्ये 42 अंश सेल्सिअस, बदलापूर-मुंब्रा-दिव्यात 41 अंश सेल्सिअस तर ठाण-मुलुंडमध्ये 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारी, 14 एप्रिल रोजीही बहुतांश भागांत तापमानाचा पारा चाळीशीच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा