Kalyan-Ahilyanagar Highway Accident: लग्नसोहळ्यासाठी खरेदी केलेले साहित्य घेऊन निघालेल्या या तीन भावंडांचे घरात पोहोचले ते निष्प्राण मृतदेह. हे दृश्य बघून केवळ नातेवाईकच नव्हे; तर ग्रामस्थांनीही हंबरडा फोडला.
मुरबाडमधील पऱ्हे गावातील मोपेवाडीत राहणारे इलेक्ट्रिशियन लक्ष्मण मोपे हे मुलांच्या शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी दिव्यात आले. एका इमारतीत घर घेऊन पत्नी अंजना आणि निकिता, अंकिता, मानसी, नेहा आणि प्रथमेश अशा पाच मुलांसह तिथे राहू लागले. सर्व मुलांचे शिक्षण सुरू असतानाच, शिर्डीला जाताना लक्ष्मण यांना अपघात झाला; यातून सावरतात तोच कॅन्सरच्या आजाराने गाठले आणि त्यातच पाच वर्षांपूर्वी पत्नी-मुलांना सोडून लक्ष्मण यांनी जगाचा निरोप घेतला. गावात शेतीवाडी असली, तरी मुलांच्या शिक्षणासाठी अंजना दिव्यात राहिल्या. पतीच्या मृत्यूनंतर दिरांनी त्यांना साथ दिली. गावच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि धान्य त्यांना पोहोचवले जात असले, तरी इतर खर्चासाठी त्या दिव्यात चार घरची धुणीभांडी करायच्या. मोठ्या मुलीचे लग्न झाल्यानंतर अंकिता आणि मानसी या दोन मुलींना त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण दिले. नेहा कलाशाखेत शेवटच्या वर्षाला होती, तर प्रथमेशने दहावीची परीक्षा दिली होती.
Mumbai Crime : गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचा ओव्हरडोस, मुंबईतील दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जणांना अटक
दोन वर्षांपूर्वी पदवीधर झालेली मानसी नोकरीच्या शोधात होती. प्रथमेशची परीक्षा संपताच, त्याच्यासह मानसी आणि नेहा अशी तिघे भावंडे सकाळीच गावाच्या दिशेने निघाली. चुलत भाऊ महेश याला पऱ्हे गावात नेण्यासाठी येण्याचा निरोप दिल्याने तो स्टॉपवर थांबला होता. मात्र त्यांची भेट झाली ती रुग्णालयातील शवागृहात ओळख पटविण्यासाठी. घटनेची माहिती मिळताच पऱ्हे ग्रामस्थांनी ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात एकच गर्दी केली. आपल्या तीन भावंडाना गतप्राण झालेले पाहून महेशने हंबरडा फोडला.
Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण-नगर महामार्ग अपघातात एका कुटुंबातील तिघांसह महसूल अधिकारीही दगावला; आजी आश्चर्यकारकरीत्या बचावली, मृतांची नावे समोर
अपघाताची माहिती मिळताच, अंजना या मुलांना भेटण्याचा हट्ट धरून बसल्या. आपल्या मुलांना भेटू देत नाहीत, म्हणजे काहीतरी विपरित घडल्याचे त्यांनी ताडले आणि त्या खालीच कोसळल्या.
