Pune PhD Student Ends Life: पीएचडीच्या गाइडकडून झालेल्या विनयभंगाच्या धक्क्यातून एका ३० वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं. नेमकं प्रकरण काय?
आत्महत्या करणाऱ्या ३० वर्षीय विद्यार्थिनींच्या वडिलांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहायक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन ( वय ५०, रा. धानोरी ) याला अटक करण्यात आली आहे.
Pune Crime : पतीशी मतभेद दूर करुन दोघांना एकत्र आणण्याचं आमिष, लॉजवर नेत अत्याचार; पुण्यात स्वयंघोषित ‘देवऋषी’ने महिलेसोबत काय केलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने शनिवारी ( ११ एप्रिल ) राहत्या घरी शाहूनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
संबंधित तरुणी बॉटनी या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती, तर आरोपी बिन्नियमिन तिचा गाइड होता. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून ठेवली असून , त्यामध्ये ऑगस्ट २०२५पासून बिन्नियमिन हा अनैतिक प्रकार , गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली.
Pune Crime: दिवसाढवळ्या पुण्यात तरुणावर हल्ला, दोघांनी मिळून 16 वर्षीय मुलाला संपवलं; आरोपींना अटक
पुन्हा अशी चूक होणार नाही
आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली, असे लिहून दिले होते; परंतु संबंधित तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नव्हती. त्यामुळे चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेतला. पोलिसांनी बिन्नियमिन याला अटक केली असून, त्याला बुधवारपर्यंत ( १५ एप्रिल ) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.
Pune Crime : पुण्यात शाळकरी मुलीचा 55 वर्षीय रिक्षाचालकाने केला विनयभंग, पोलिसांकडून तत्काळ कारवाई; पोक्सो दाखल, आरोपीला अटक
तर दुसऱ्या एका घटनेत, अंधश्रद्धेच्या नावाखाली विवाहित महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याचा गंभीर प्रकार कात्रज परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय महिलेने पतीसह एका वास्तू सल्लागार आणि स्वतःला ‘होलिस्टिक हीलर’ म्हणवणाऱ्या महिलेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
