Mumbai Traffic Changes: मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने महत्त्वाचे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या बदलांचे पालन करण्याचे निर्देश मुंबई वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काही महत्त्वाचे वाहतूक बदल जारी केले आहेत. त्यामुळे 13 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 135वी जयंती आहे. 14 एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या जयंतीनिमित्त हजारो अनुयायी दादरमधील चैत्यभूमीला भेट देतात. त्यामुळे या परिसरात 13 एप्रिलपासूनच नागरिक दाखल होण्यास सुरूवात होते. ही गर्दी लक्षात घेऊन चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांजवळील वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. 13 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. 14 एप्रिल मध्यरात्री 12 पर्यंत हे निर्बंध लागू राहतील.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा! अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांवर, हवामान विभागाची माहिती
कोणत्या मार्गांवर बदल?
सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्चपर्यंत एसके बोले रोड या मार्गावरील एकाबाजूची वाहतूक बंद केली जाणार आहे. तसेच, सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन दरम्यान एसव्हीएस रोड सर्व वाहनांसाठी बंद राहील. मात्र, स्थानिक रहिवाशांना रस्ता क्रमांक 5 मार्गे प्रवेश दिला जाईल. रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असून ज्ञानेश्वर मंदिर रोड एसव्हीएस रोडच्या जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यंत बंद असेल.
अवजड वाहनांवरही बंदी
चैत्यभूमीजवळ गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुलभ करण्यासाठी टेम्पोसह सर्व अवजड आणि मालवाहतूक वाहने वळवण्यात येतील. बेस्ट बसला वगळता अवजड वाहने माहीम जंक्शनवरून एलजे रोडमार्गे वळविण्यात येणार आहेत.
Mumbai Local : सुट्टीच्या दिवशीच मुंबई लोकलचा खोळंबा; तासभरानंतरही ट्रेन निघत नसल्याने प्रवाशांचा ट्रॅकवरुन मार्ग, नेमकं काय घडलं?
पार्किंग व्यवस्था
दरम्यान, काही ठराविक ठिकाणी पार्किंगला मंजुरी असेल,
सेनापती बापट मार्ग (माहीम आणि दादरहून येणाऱ्या वाहनांसाठी)
इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल, एल्फिन्स्टन
कोहिनूर स्क्वेअर पीपीएल, कोहिनूर मिल कंपाऊंड, शिवाजी पार्क
कामगार स्टेडियम, सेनापती बापट मार्ग
इंडिया बुल्स सेंटर पीपीएल, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एल्फिन्स्टन
फाइव्ह गार्डन
या कालावधीत मुंबईकरांनी या सर्व निर्देशांचे पालन करत पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिले आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा