Jalgaon Leopard Rescue Operation: शिवसेनेच्या उत्साही आमदाराने जमावात सहभागी होऊन बिबट्या पकडण्यासाठी हाती दंडुका घेतला, जमावाने या मुक्या प्राण्याला जबर मारहाण केलीय
शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास बिबट्या आढळल्याचे समजताच बघ्यांची गर्दी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुक्ताईनगर पोलिस आणि वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने विश्रामगृह गाठले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारले.
Gondia Accident: क्रूर नियती! लग्नाला जाताना वाटेत काळानं गाठलं; बहीण-भावाचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी
डार्टमुळे बिबट्याला ग्लानी आली. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी हातात काठी घेऊन बिबट्यावर काठीचे तडाखे दिले. त्यांच्यासह जमावाने बिबट्यावर काठीचे तडाखे देण्यात आले. जखमी बिबट्यावर अमानुष छळ केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Nandurbar Crime : ‘हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?’ नंदुरबारमध्ये ‘हॉटेल मंदाकिनी’च्या मॅनेजरला संपवलं
वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेतले असून, त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि जमावाकडून झालेल्या मारहाणीबाबत वन विभाग काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागभीड वनपरिक्षेत्रातील हल्लेखोर वाघ जेरबंद
चंद्रपूर: नागभीड वनपरिक्षेत्रात दोन जणांचा बळीस जबाबदार असणाऱ्या हल्लेखोर वाघाला शनिवारी संध्याकाळी तळोधी वनक्षेत्रातील सावरला गावाजवळ बेशुद्ध करून पकडण्यात आले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. ब्रह्मपुरीचे विभागीय वनाधिकारी कुमार स्वामी यांच्या देखरेखीखाली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने ही कारवाई केली. पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे यांनी वनपरीक्षेत्राधिकारी ए. आर. कन्नमवार यांच्या मदतीने वाघाला बेशुद्ध करणाऱ्या आरआरटी पथकाचे नेतृत्व केले. या वाघाने गेल्या पंधरवड्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा बळी घेतला होता. शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास, तो हल्लेखोर वाघ बेटाजवळ आला असता तज्ञ नेमबाज अजय मराठे यांनी त्याला यशस्वीरित्या डार्ट मारला. त्यानंतर बेशुद्ध केलेल्या त्या वाघाला एका पिंजऱ्यात सुरक्षित ठेवून पुढील तपासणी आणि देखरेखीसाठी गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलवण्यात आले.
