Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा चटका बसायला सुरूवात झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद झाली होती. या आठवड्यातही हे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीचा फटका बसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव आणि मालेगाव हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले असून रविवारी कमान तापमान 41 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. तसेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली असून सोमवारी पारा चढाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईकर अस्वस्थ
कोकण किनारपट्टीजवळ तापमान इतर जिल्ह्यांपेक्षा कमी नोंदलं गेलं. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असून कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. दिवसभर वातावरण दमट व उष्ण राहून दुपारी घामाच्या धारा लागणार आहेत. अशा उकाड्यामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, पुण्यात पारा 40 अंशावर पोहोचला असून सोमवारी तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदलं जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 21 ते 26 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.Mumbai Local: पश्चिम रेल्वेवर प्रवास होणार सुखकर! चर्चगेट-डहाणू लवकरच धावणार 15 डब्यांची लोकल; स्थानकांवर काम अंतिम टप्प्यात
अकोला जिल्ह्यात 42 अंशावर
विदर्भातील अकोला येथे तापमान शनिवारी 42 अंशाच्या पुढे गेले होते. अकोला शनिवारी राज्यातील सर्वात उष्ण जिल्हा ठरला होता. रविवारीही उन्हाचा कडाका जिल्ह्यात कायम होता. आजही अशीच परिस्थिती कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भात पारा 34 ते 35 पर्यंत पोहोचला होता. अवकाळी पावसाने वातावरण थोडं थंड झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा वातावरण वाढले आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातही तापमान वाढले असून उन्हाच्या झळा बसत आहेत. सोलापूर जिल्ह्यात पारा 41.4 अंशावर पोहोचला होता. तसेच, सांगली आणि जेऊरमध्या रविवारी तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं होतं. नागपूर जिल्ह्यातील कमाल तापमान पण झपाट्याने वाढत असून रविवारी 39.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा